Crime News: सीसीटीव्हीमुळे 22 वर्षाचा चोर अटकेत, पण 'कामगिरी' ऐकताच पोलिसही चक्रावले!
Crime News: फक्त 22 वर्ष वय असलेल्या या चोराने तब्बल 24 गुन्हे केल्याची माहिती समोर आली आहे. एवढ्या लहान वयात एवढे गुन्हे केल्याने पोलीसही चक्रावले आहेत.
Crime News: एका इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात काउंटरवरून एका चोराने पैसे काढल्याची घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली होती. कल्याणच्या कोळशेवाडी पोलिसांनी (Kalyan Kolsewadi Police Station) या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे चोराला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये या 22 वर्षीय चोराने दिलेल्या कबुलीनाम्यानंतर पोलिसही (Police) चक्रावून गेले. या 22 वर्षीय चोराने तब्बल 24 चोरी केली असल्याची माहिती समोर आली आहे. एवढ्या लहान वयात एवढे गुन्हे केल्याने पोलीसही चक्रावले आहेत.
करण गाडा असे या चोराचे नाव आहे. अवघे 22 वर्ष वय असलेल्या या चोराने आतापर्यंत मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आसपासच्या परिसरात एकूण 24 चोऱ्या केल्याचे उघड झाले (Crime In Thane, Mumbai) आहे. करणने आणखी चोरीचे गुन्हे केले असावे असा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीनेही पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे. कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी हरिदास बोचरे आणि दिनकर पगारे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे
कल्याण पूर्वेतील तीसगाव नाका परिसरात राजेश प्रजापती यांचे एक इलेक्ट्रॉनिकचे दुकान आहे. या दुकानात 28 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एक तरुण काही वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने प्रजापती यांच्या दुकानात आला. प्रजापती झोपले असल्याची संधी साधत या तरुणाने दुकानाच्या काऊंटरमधील आणि दुकानात ठेवलेल्या पर्समध्ये असलेले काही पैसे घेवून हा तरुण पसार झाला.
सीसीटीव्ही कॅमेरात ही चोरी कैद झाली होती. कोळशेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय हरिदास बोचरे व दिनकर पगारे यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. सीसीटीव्हीच्या आधारे ओळख पटवत पोलिसांनी अवघ्या काही तासात करण गाडा याला बेड्या ठोकल्या. करणच्या चौकशी दरम्यान त्याने आतापर्यंत 24 चोरीचे गुन्हे केले असल्याचे उघड झाले. करणने आतापर्यंत मुंबई, ठाणे आणि जवळपासच्या ठिकाणी तब्बल 24 चोरीचे गुन्हे केले आहेत. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. अजूनही काही चोरी प्रकरणाचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: