महिला पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालणं तरुणाला महागात; जळगावमध्ये धू धू धुतलं...!
Jalgaon News Updates : महिला पोलिसाशी हुज्जत घालणाऱ्या तरुणाला संतप्त जमावाने जोरदार मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
![महिला पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालणं तरुणाला महागात; जळगावमध्ये धू धू धुतलं...! Jalgaon News Updates Young man beaten for abusing female police jalgaon महिला पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालणं तरुणाला महागात; जळगावमध्ये धू धू धुतलं...!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/18/fffb68b2e47d273e7056bd63123582aa_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jalgaon News Updates : जळगावमध्ये वाहतूक पोलीस ड्युटी करीत असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालने तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. महिला पोलिसाशी हुज्जत घालणाऱ्या तरुणाला संतप्त जमावाने जोरदार मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. जळगाव शहरातील नेरी नाका परिसरात हा प्रकार घडला आहे.
या वेळी वाहतूक पोलिसांनीच सुरक्षा दिल्यानं सदर तरुण थोडक्यात बचावला. जळगाव शहरातील नेरी नाका परिसर हा अतिशय वर्दळीचा भाग आहे. या ठिकाणी वाहतूक नियंत्रित करीत असताना एका महिला पोलिस कर्मचाऱ्यास एका व्यक्तीने आपण पत्रकार असल्याचं सांगत एका महिलेचा नंबर मागितला. कोणताही संबंध नसलेल्या महिलेचा नंबर सदर तरुण या महिला पोलिसाकडे मागत होता. त्यांनी आपल्याला नंबर माहीत नाही असं त्या तरुणास सांगितले.
यानंतर त्या तरुणानं सदर महिला पोलिस कर्मचाऱ्याचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढला आणि हुज्जत घालण्यास सुरुवात केली. वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने सदर तरुणाचा प्रकार खटकला. यावेळी तिथला जमाव पोलीस कर्मचारी महिलेच्या मदतीला धावून आला. गर्दीतील काही तरुणांनी सदर तरुणास चोप देण्यास सुरुवात केली.
यावेळी परिसरातील काही वाहतूक पोलीस कर्मचारी धावून आले आणि त्यांनी सदर तरुणाची गर्दीतून सुटका केली. यानंतर त्याला पोलीस ठाण्यात नेले. सदर तरुणाच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे.
बोदवडमध्ये छेड काढणाऱ्या तरुणाला शाळकरी मुलींकडून चोप
काही दिवसांपूर्वी जळगावातील बोदवडमध्ये एक तरुण शाळेत जाणाऱ्या मुलींची छेड काढत असल्याचं समोर आलं होतं. परंतु या मुलींनी शांत न राहता त्याला चोप देऊन अद्दल घडवली होती. शाळेत जात असताना छेड काढणाऱ्या तरुणास मुलींनी चांगलाच चोप दिला होता. जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात येवती गावाजवळ हा प्रकार घडला होता. मुलींचा रुद्रावतार पाहिल्यानंतर आजूबाजूला असलेल्या लोकांनीही तरुणाला फटके देत त्याला पोलिसांकडे सोपवलं होतं.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)