एक्स्प्लोर

संतापजनक! स्कूल व्हॅन चालकाकडून साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य, भुसावळमध्ये खळबळ

Jalgaon Crime News : भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नर्सरीत शिकणाऱ्या साडेतीन वर्षीय चिमुकलीवर स्कूल व्हॅन चालकाने गैरकृत्य केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

जळगाव : भुसावळ (Bhusawal) शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये (School) नर्सरीत शिकणाऱ्या साडेतीन वर्षीय चिमुकलीवर स्कूल व्हॅन चालकाने गैरकृत्य केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे भुसावळ शहरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी विरोधात पोस्कोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, साक्री फाटा (Sakri Phata) परिसरात एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नर्सरीत शिकणाऱ्या साडेतीन वर्षीय मुलीसोबत स्कूल व्हॅन चालकाने (School Van Driver) शाळेच्या बाहेर स्कूल व्हॅनमध्ये चिमुकलीला बसवले. त्यानंतर चिमुकलीसोबत गैरकृत्य केले. 

पोक्सोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

चिमुकली घरी आल्यानंतर पालकांच्या हा प्रकार लक्षात आला. यावेळी पालकांनी तात्काळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला (Bajarpeth Police Station) धाव घेतली. पोलिसांनी संशयित स्कूल व्हॅनचालक प्रसाद हिरामण चौधरी (Prasad Hiraman Chaudhary) यास अटक करून त्याच्या विरुद्ध पोस्कोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. चालकाला पोलिसांनी अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, भुसावळ शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या गुन्ह्यात अल्पवयीन तरुणांचाही सहभाग असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भुसावळ शहरातील गुन्हेगारी (Jalgaon Crime News) आटोक्यात आणण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.  

भुसावळमध्ये भरदिवसा घरफोडी 

भुसावळ शहरातील वांजोळा रोडवरील (Vanjola Road) गजानन अपार्टमेंटमधील रहिवासी नरेश घनश्यामदास रोहाडा यांच्या बंदघराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे 10 तोळे सोने व आठ हजारांची रोकड लांबवल्याचा प्रकार घडला आहे. शहरात सातत्याने वाढणाऱ्या चोऱ्या व घरफोड्यांमुळे शहरातील नागरिक धास्तावले आहेत. वांजोळा रोडवरील गजानन अपार्टमेंटमधील फ्लॅट नंबर 303 मध्ये नरेश रोहाडा यांचा शिलाई मशीन दुरुस्तीचा व्यवसाय आहे. त्यांची पत्नी माहेरी गेल्यानंतर नरेश हे शनिवारी नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावून सकाळपासून दुकानात होते. दुपारी चार वाजता घरी आले तेव्हा दाराला कुलूप नसल्याचे लक्षात आले. घरात प्रवेश करताच घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त झालेले दिसून आल्याने घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Nashik Crime : घरात घुसून 18 वर्षीय तरुणाला संपवलं, शेजारी झोपलेल्या भावालाही समजलं नाही, नाशिक पुन्हा हादरलं!

धक्कादायक! खाऊ देण्याच्या बहाण्याने बोलावलं, अत्याचार करून अल्पवयीन मुलीचा खून; भिवंडी शहर हादरलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Embed widget