एक्स्प्लोर

Jalgaon Crime News: पती-पत्नीने एकाच दोरीने संपवली जीवनयात्रा, दोन चिमुकली मुलं पोरकी; जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Jalgaon Crime News: जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर येथे पती-पत्नीने शेतात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना समोर आली आहे.

Jalgaon Crime News: जळगावच्या (Jalgaon) चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील शिवापूर (Shivapur) येथे पती-पत्नीने शेतात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भगवान जाधव आणि आशाबाई जाधव असे या मृत दाम्पत्याचे नाव असून, त्यांच्या या टोकाच्या पावलामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे दोन लहान मुले पोरकी झाली असून जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Jalgaon Crime News)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवापूर शिवारातील आपल्याच शेतात असलेल्या उंबराच्या झाडाला या पती-पत्नीने एकाच दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. घरापासून अवघ्या 300 फूट अंतरावर ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले.

Jalgaon Crime News: शिवापूर गावावर शोककळा

दरम्यान, मृत भगवान आणि आशाबाई यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन लहान मुलं आहेत. दाम्पत्याची दोन्ही मुले शिक्षणासाठी बाहेरगावी असल्याने घरी नव्हती. आपल्या आई-वडिलांनी अशा प्रकारे जीवन संपवल्याचे समजताच मुलांसह नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. सुखी संसाराचा अचानक असा अंत झाल्याने शिवापूर गावावर शोककळा पसरली आहे. जाधव दाम्पत्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, आत्महत्येमागचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. 

Nashik Crime News: तमाशात मध्यरात्री राडा; दगडफेक, तोडफोडीत 10 जखमी

दरम्यान, मालेगाव तालुक्यातील टोकडे गावात दुर्गादेवी यात्रेनिमित्त आयोजित तमाशा कार्यक्रमादरम्यान मध्यरात्री अचानक हिंसाचार उसळला. काही समाजकंटकांच्या टोळक्याने कार्यक्रमस्थळी घुसून दगडफेक करत धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात सुमारे 8 ते 10 जण जखमी झाले असून, जखमींमध्ये एका लहान बालकाचाही समावेश आहे.

हल्लेखोरांनी गावातील दोन घरांवर दगड व विटांनी हल्ला करत तोडफोड केली, तसेच काही वाहनांचेही नुकसान केले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी मोठा गोंधळ उडाला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत काही संशयितांना ताब्यात घेतले असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. जखमींवर मालेगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

आणखी वाचा 

नोकरी गेल्याने मानसिक धक्का, मुंबईच्या आदित्य सातपुतेंचं पुण्यातील एफसी रोडवर टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
Pune Crime News: नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
Shraddha Walker Death Case: श्रद्धा वालकरसाठी बोलायला लागले आणि पाकिस्तानातून निनावी फोन येऊ लागले; आत्या राजल नाईकांचा गंभीर आरोप
श्रद्धा वालकरसाठी बोलायला लागले आणि पाकिस्तानातून निनावी फोन येऊ लागले; आत्या राजल नाईकांचा गंभीर आरोप
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Embed widget