Jalgaon Crime : पोलीस भरतीच्या परीक्षेत 'हायटेक कॉपी'चा प्रयत्न; जळगावातील मुन्नाभाई अटकेत, लघुशंकेसाठी अनेकवेळा बाहेर पडल्यानं पोलखोल
Jalgaon Crime News : पोलीस भरतीच्या परीक्षेत 'हायटेक कॉपी'चा प्रयत्न करणारा जळगावातील मुन्नाभाई अटकेत आहे. लघुशंकेसाठी अनेकवेळा बाहेर पडल्यानं पोलखोल झाली.
Jalgaon News : जळगावमध्ये पोलीस भरती प्रक्रिया परीक्षेत गैरप्रकार करणारा मुन्नाभाई पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. आता तुम्ही म्हणाला मुन्नाभाई याचं नाव आहेत. तर नाही. मुन्नाभाई चित्रपटात अभिनेता संजय दत्त ज्याप्रकारे वैद्यकीय परीक्षा पास होतात. तशीच काहीशी पद्धत पोलीस भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा देणाऱ्या या विद्यार्थ्यानं अवलंबली होती. त्याच्या पायाच्या नी-क्यॅपमध्ये आणि कानात एक डिव्हाइस लपवलेलं होतं. पोलिसांनी वेळीच हटकल्यामुळे हा गैरप्रकार उघडकीस आला.
काल जळगावमध्ये पोलीस भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा होती. परीक्षा सुरु होण्याच्या काही मिनिट अगोदर एक उमेदवार दोन ते तीन वेळेस लघु शंकेचं कारण सांगून बाहेर जाऊन आला, त्याच्या संशयास्पद हालचाली बघून पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याची झडती घेतली. या तरुणानं नी-क्यॅपमध्ये एक डेबिट कार्ड सदृश्य डिव्हाईस लपवलं होतं. तर कानात आणखी एक सूक्ष्म डिव्हाईस लपवलं होतं. याच डिव्हाइसच्या माध्यमातून लेखी परीक्षेत बाहेरून मदत घेण्याचा या तरुणाचा प्रयत्न होता. या प्रकरणी पोलीस भरती प्रक्रियेत गैरप्रकार केल्याच्या कारणावरून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
पोलीस भरती प्रक्रिया परीक्षेत गैरप्रकार करणारा मुन्नाभाई पोलिसांच्या जाळ्यात अडकला असल्याची घटना काल (शनिवारी) जळगाव शहरात उघडकीस आली आहे. सदर तरुणाच्या विरोधात पोलीस भरती प्रक्रियेत गैरप्रकार केल्याच्या कारणावरून आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानं पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली असल्याचं पाहायला मिळत आहे.
काल (शनिवारी) जळगावमध्ये पोलीस भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा होती शहरातील वाघ नगर परिसरात असलेल्या परीक्षा हॉल सेंटरमध्ये परीक्षार्थी उमेदवारांना सोडण्यात आल्यानंतर परीक्षा सुरु होण्याच्या काही मिनिटं अगोदर एक उमेदवार दोन ते तीन वेळेस लघु शंकेचे कारण सांगून बाहेर जाऊन आला. त्यावेळी त्याच्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या पोलिसांनी त्याला हटकलं आणि त्याची झडती घेतली. त्यावेळी पोलिसांना सदर तरुणाच्या पायाला असलेल्या नी-क्यॅपमध्ये एक डेबिट कार्ड सदृश्य डिव्हाईस आढळून आलं, हे डिव्हाईस पकडलं गेल्यानंतर सदर तरुण जास्तच घाबरुन जाऊन त्यानं कानात लपविलेलं आणखी एक सूक्ष्म डिव्हाईस पोलिसांना दाखविलं, ते कानात अशा पद्धतीनं लावण्यात आलं होतं की, कोणालाही सहज दिसून येणार नाही. हे कानातील डिव्हाईस काढण्यासाठी पोलिसांनाही चांगलीच मेहनत घ्यावी लागली होती. याच डिव्हॉईसच्या माध्यमातून लेखी परीक्षेत बाहेरून मदत घेण्याचा या तरुणाचा प्रयत्न होता.
परीक्षा सुरु होण्या अगोदरच हा प्रकार उघडकीस आल्यानं सदर तरुणास लेखी परीक्षसाठी बसू देण्यात आले असले तरी पोलीस भरती प्रक्रियेत गैरप्रकार केल्याच्या कारणावरून मात्र त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. सदर तरुणास पोलीस भरतीत गैरप्रकार करून पोलीस दलात दाखल होण्याचं स्वप्न आता धुळीस मिळाल्यासारखं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :