एक्स्प्लोर

रेल्वेत विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी एनसीबीच्या बड्या अधिकाऱ्याला अटक!

उदगीर-लातूर रोड दरम्यान रेल्वेत एका विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी एनसीबीच्या (NCB) बड्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

लातूर : रेल्वेमध्ये प्रवास करत असताना एका विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी एनसीबीच्या एका बड्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आलीय. उदगीर-लातूर रोड दरम्यान एका विद्यार्थिनीची छेडछाड करण्यात आल्याचा प्रकार हैदराबाद-हडपसर या पँसेंजर रेल्वे गाडीमध्ये रात्री घडला असून याप्रकरणी विद्यार्थिनीने एका व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. छेडछाड करणारा व्यक्ती हा एनसीबीचा अधिकारी आहे. एनसीबीचा अधीक्षक असलेल्या दिनेश अंकुश चव्हाण या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

सध्या राज्यात एनसीबी विशेष सक्रिय आहे. मुंबईतील क्रूझवरील कथित ड्रग्ज पार्टीसंदर्भात दररोज वेगवेगळ्या बातम्यांनी एनसीबी सक्रिय आहे. सध्या चित्रपट अभिनेता शाहरुख खान आणि अन्य काही जणांना ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते एनसीबीविरुद्ध दररोज वेगवेगळे आरोप करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर एनसीबीच्या या अधिकाऱ्याला विद्यार्थीनीच्या छेडखानीप्रकरणी अटक झाली आहे.  

या प्रकरणी आरोपीविरुद्ध परळी येथील जीआरपी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 354, 509 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची माहिती अशी की काल रात्री हैदराबाद-हडपसर या रेल्वेने एनसीबीचा एक अधिकारी आणि एक विद्यार्थिनी प्रवास करीत असताना त्या अधिकाऱ्याने विद्यार्थिनीची छेड काढली. त्यानुसार विद्यार्थिनीने रेल्वे पोलिसाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यावरून आरोपीस परळी रेल्वेच्या जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार लातूर रोड दरम्यान घडला आहे.


रेल्वेत विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी एनसीबीच्या बड्या अधिकाऱ्याला अटक!

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे म्हणाले..
परळी-लातूर रोड दरम्यान हडपसर-हैदराबाद पॅसेंजर ट्र्नेमध्ये झालेल्या प्रकाराविषयी, एनसीबीचे मुंबईतील झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की दिनेश चव्हाण हे गेल्या  अनेक दिवसांपासून रजेवर आहेत आणि ते एनसीबीचे अधिकारी असले तरी काही वैयक्तिक समस्यांमुळे एनसीबीच्या  बाहेर आहेत. समीर वानखेडे यांनी असेही सांगितले की दिनेश चव्हाण त्यांच्या कोणत्याही ऑपरेशनमध्ये सहभागी नसतात.  काही महिन्यांपूर्वी दिनेश चव्हाण यांचा अपघात झाला होता, त्यानंतर त्याला त्रास होत होता.

आरोपी दिनेश अंकुश चव्हाण (वय 35 वर्षे रा. ठी. सेक्टर 15, रुम नं.18, कोपरखैरणे, नवी मुंबई) हा नार्कोटिक्स डिपार्टमेंट, भारत सरकार यांचा अधीक्षक दर्जाचा अधिकारी आहे. त्यांच्याकडे ओळखपत्र असून एम.आर. पोलीस ठाणे, मुंबई शहर यांचे मार्फत याबाबत खात्री केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला मालकाने अन् पोराने जागीच संपवलं, हिंगोलीत हादरलं, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे ट्विट
पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला मालकाने अन् पोराने जागीच संपवलं, हिंगोलीत हादरलं, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे ट्विट
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
विलास घुले प्रकरणात नवा ट्विस्ट! आरोपी मंगेश कदमला रुग्णालयात बेदम मारहाण; CCTV व्हिडिओ समोर येताच पत्नी थेट पोलीस अधीक्षकांकडे
विलास घुले प्रकरणात नवा ट्विस्ट! आरोपी मंगेश कदमला रुग्णालयात बेदम मारहाण; CCTV व्हिडिओ समोर येताच पत्नी थेट पोलीस अधीक्षकांकडे
Nashik Crime News: नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...

व्हिडीओ

Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
Rupali Patil Thombare: हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
Manoj Jarange Patil and Ajay Baraskar: मनोज जरांगे संघर्षयोद्धा नव्हे तर टेंडर योद्धा, विखे-पाटलांनी 5000 कोटींचं कंत्राट दिलं, अजय बारस्करांचा खळबळजनक आरोप
मनोज जरांगे संघर्षयोद्धा नव्हे तर टेंडर योद्धा, विखे-पाटलांनी 5000 कोटींचं कंत्राट दिलं, अजय बारस्करांचा खळबळजनक आरोप
Smriti Mandhana: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
Video: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
Sunetra Pawar: अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, पण मी दादांसारखी नाही, एकदा बाहेर ते कायमचे बाहेर! सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा
अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, पण मी दादांसारखी नाही, एकदा बाहेर ते कायमचे बाहेर! सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा
Embed widget