एक्स्प्लोर

Jalgaon Crime News: जनक्रांती मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षांवर दिवसाढवळ्या हल्ला, दुचाकीवर आलेल्या टोळक्याने गाडी अडवली अन्...; जळगावात खळबळ

Jalgaon Crime News: जळगाव शहरातील गजबजलेल्या रिंग रोड परिसरात जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Jalgaon Crime News: जळगाव (Jalgaon) शहरातील गजबजलेल्या रिंग रोड परिसरात आज शनिवारी (दि.11) दुपारी जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे (Mukund Sapkale) यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने सपकाळे यांची कार अडवून चारही बाजूंनी जोरदार दगडफेक केली. या भीषण हल्ल्यात सपकाळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून शहरात खळबळ उडाली आहे.

Jalgaon Crime News: नेमकी घटना काय?

मुकुंद सपकाळे हे आपल्या काही कार्यकर्त्यांसह कारने रिंग रोड परिसरातून जात होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या काही तरुणांनी त्यांची गाडी अडवली आणि काही कळण्याच्या आतच वाहनावर दगडांचा वर्षाव सुरू केला. हल्लेखोरांनी इतक्या जोराने दगडफेक केली की कारच्या काचा फुटून सपकाळे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. हल्ल्यानंतर सपकाळे यांनी स्वतः जिल्हा पेठ पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Jalgaon Crime News: हल्ल्याचे कारण काय?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला बॅनर छपाईच्या वादातून झाला असल्याचे समोर येत आहे. मुकुंद सपकाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल अहिरे नावाच्या तरुणासोबत त्यांचा वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून विशालने आपल्या साथीदारांसह हा हल्ला केल्याचा आरोप सपकाळे यांनी केला आहे.

Jalgaon Crime News: पोलिसांची कारवाई  

भरदिवसा शहराच्या मुख्य भागात हा हल्ला झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यास सुरुवात केली आहे. मुख्य संशयित आरोपी विशाल अहिरे आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. जळगावात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता या राजकीय पदाधिकाऱ्यावरील हल्ल्यामुळे पोलीस प्रशासनासमोर आरोपींना तातडीने अटक करण्याचे आव्हान आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Mumbai Virar Accident: भीषण अपघात! विरुद्ध दिशेने येणाऱ्या हायवा ट्रकने शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेला उडवलं; घटनास्थळीच दुर्दैवी अंत

Pune Crime News: पुण्यातील 'रील स्टार' सोनाली हिंगे अन् दोन पोलिसांचे अखेर निलंबन, प्राचार्यांकडून उकळली होती सात लाखांची खंडणी

महत्त्वाच्या बातम्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
Embed widget