एक्स्प्लोर

Pune Crime News: पुण्यातील 'रील स्टार' सोनाली हिंगे अन् दोन पोलिसांचे अखेर निलंबन, प्राचार्यांकडून उकळली होती सात लाखांची खंडणी

Pune Crime News: पुणे शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडवणाऱ्या प्रकरणात ‘रील स्टार’ म्हणून ओळखली जाणारी महिला पोलीस कर्मचारी सोनाली हिंगे हिच्यासह तिघा पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे.

Pune Crime News: पुणे शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडवणाऱ्या प्रकरणात ‘रील स्टार’ म्हणून ओळखली जाणारी महिला पोलीस कर्मचारी सोनाली हिंगे (Sonali Hinge) हिच्यासह तिघा पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना ब्लॅकमेल करून तब्बल सात लाखांची खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप या तिघांवर आहे.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अजित बडे (Ajit Bade) (सध्या सायबर पोलीस ठाणे), पोलीस शिपाई सुदाम तायडे (Sudam Tayade) आणि दामिनी पथकातील सोनाली हिंगे या तिघांचा समावेश आहे. कर्तव्यातील हलगर्जीपणा आणि बेजबाबदार वर्तन केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत हे निलंबन कायम राहणार आहे.

Pune Crime News: नेमकं प्रकरण काय?

या प्रकरणाचा उलगडा अत्यंत धक्कादायक पद्धतीने झाला. एका महाविद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीची काही कागदपत्रे अडकल्याने तिने पोलिसांची मदत घेतली. मात्र, या तिघा पोलिसांनी याचाच गैरफायदा घेत विद्यार्थिनीला सोबत घेऊन प्राचार्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी विद्यार्थिनीमार्फत प्राचार्य आणि महाविद्यालयाविरोधात छळाची तक्रार देण्यास भाग पाडले.

Pune Crime News: प्राचार्यांकडून उकळले सात लाख रुपये

तक्रारीची भीती दाखवत या तिघांनी प्राचार्यांना धमकावले. ‘प्रकरण गंभीर आहे, अनेक तक्रारी आहेत. जर केस दाखल झाली तर तुमच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करू आणि महाविद्यालयाची बदनामी करू,’ अशी धमकी देत तब्बल 10 लाखांची मागणी करण्यात आली. भीतीपोटी प्राचार्यांनी 7 लाख रुपये दिले, अशी माहिती समोर आली आहे. ही रक्कम तिघांनी आपापसांत वाटून घेतल्याचाही आरोप आहे.

दरम्यान, संपूर्ण प्रकार पाहून विद्यार्थिनीला संशय आला आणि तिने धाडस दाखवत पालकांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. चौकशीत हा प्रकार उघड झाल्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Pune Crime News: पोलीस आयुक्त 'अ‍ॅक्शन मोड'वर

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार  यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले आणि प्राथमिक तपासात दोष स्पष्ट झाल्यानंतर कडक कारवाई करत संबंधितांना निलंबित केले. गुन्हेगारांवर वचक ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनीच वर्दीचा गैरवापर करून खंडणी उकळल्याने खाकीवरील विश्वासाला तडा गेला आहे. या प्रकरणामुळे पुणे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली असून, पुढील चौकशीत आणखी काय उघड होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा 

Pune Crime News: कोचिंग क्लासच्या ऑफिस बॉयचा काळा कारनामा, आठवीतल्या मुलाला स्टोअर रूममध्ये नेऊन नको ते केलं, पुण्यातील संतापजनक प्रकार

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहाण प्रकरण! रमेश म्हात्रेला न्यालालयाचा दणका, जामीन देता येणार नसल्याचं स्पष्टीकरण, जेलमधील मुक्काम वाढला
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! रमेश म्हात्रेला न्यालालयाचा दणका, जामीन देता येणार नसल्याचं स्पष्टीकरण, जेलमधील मुक्काम वाढला
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा

Embed widget