Jalgaon Accident : ओमनी अन् दुचाकीची जोरदार धडक, तीन जणांचा जागीच मृत्यू, 4 जखमी
Jalgaon Accident : नाशकात ओमनी आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय.
Jalgaon Accident : अमळनेर तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ ओमनी आणि दुचाकींचा अपघात होऊन त्यात तीन जण जागीच ठार झाल्याचे वृत्त समोर येत आहे. या अपघातात चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे. हा अपघात रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दहीवद फाट्याच्या जवळ घडला आहे.
जखमींवर अमळनेर ग्रामीण उपचार सुरु
अधिकची माहिती अशी की, चोपडा येथील सहा जण दोन मोटार सायकलने मंगरूळ येथे केटरर्सचे काम करण्यासाठी आले होते. ते ट्रिपलशीट मोटरसायकलवरून जात असताना चोपड्याकडून येणाऱ्या ओमनीसोबत त्यांची धडक झाली. यात तीन जण जागीच ठार झाले. जखमींवर अमळनेर ग्रामीण उपचार सुरु आहेत.
दोन मयतांची ओळख पटली आहे. तर इतरांची ओळख पटलेली नाहीय.
नाशकात बस स्थानकावर बसचे नियंत्रण सुटल्यावर भीषण अपघात
नाशिकच्या मेळा बस स्थानकात फलाट क्रमांक सहाच्या बाजूला असलेल्या चौकशी कक्षाला बस धडकली. बसवरचे नियंत्रण सुटल्याने बस थेट स्थानकात घुसली. महाराष्ट्र परिवहन महामंडळाची इलेक्ट्रिक बसने दोन ते तीन प्रवासी चिरडले आहेत. बस चालकच नियंत्रण सुटल्याने घडला अपघात, अपघातात एक ठार तर दोघे गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. रात्रीच्या वेळी बस ठरल्या वेळेत बस स्थानकात आल्यानंतर बस चालकाचा नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची माहिती आहे. बस चालकला मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नाशिक ब्रेकिंग...
- नाशिकच्या मेळा बस स्थानकात फलाट क्रमांक सहाच्या बाजूला असलेल्या चौकशी कक्षाला बस थडकली,बसचे नियंत्रण सुटल्याने बस थेट घुसली स्थानकात...
- महाराष्ट्र परिवहन महामंडळाची इलेक्ट्रिक बसने चिरडले दोन ते तीन प्रवासी
- बस चालकच नियंत्रण सुटल्याने घडला अपघात, अपघातात एक ठार तर दोघे गंभीर जखमी असल्याची माहिती...
- रात्रीच्या वेळी बस ठरल्या वेळेत बस स्थानकात आल्यानंतर बस चालकाचा नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची माहिती
- बस चालकला मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती...
इतर महत्त्वाच्या बातम्या