एक्स्प्लोर

Crime: दोन्ही मुलीच झाल्या म्हणून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; चाळीसगावातील घटनेनं खळबळ; चिमुकल्यांचं छत्र हरपलं

Jalgaon Crime News: लग्नानंतर दोन्ही मुलीच झाल्या याचा राग डोक्यात ठेवून पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड मारून तिची हत्या केली.  त्यानंतर स्वत: रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली.

Jalgaon Crime News: लग्नानंतर दोन्ही मुलीच झाल्या याचा राग डोक्यात ठेवून पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड मारून तिची हत्या केली.  त्यानंतर स्वत: रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची मन सुन्न करणारी घटना चाळीसगाव शहरात घडली. पत्नी दुसऱ्या बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. आईवडीलांच्या मृत्यूने दोन्ही चिमुकल्या मुलींचे मातृ व पितृ छत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्‍त केली जात आहे. सुरज दिलीप कुऱ्हाडे (वय-28) असे आत्महत्या केलेल्या पतीचं नाव आहे तर रेश्मा सुरज कुऱ्हाडे असे मयत पत्नीचे नाव आहे. 

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, धुळे जिल्ह्यातील जुनोने येथील रेश्मा सोबत तीन वर्षांपुर्वी सूरज याचा विवाह झाला होता. तो पत्नी आणि मुलाबाळांसह चाळीसगाव शहरातील करगाव रोडवरील जय गणेश नगर वास्तव्याला होता. मातीकाम करून आपला उदरनिर्वाह करत होता. लग्नानंतर सूरजला पहिली मुलगी झाली. मात्र त्याला मुलाची इच्छा होती. सूरला दारूचे व्यसन देखील होते. या दोन्ही कारणावरून त्याचे पत्नी रेश्मा हिच्यासोबत नेहमीच भांडण व्हायचे. गेल्या चार महिन्यांपुर्वीच रेश्मा दुसऱ्या बाळंपणासाठी माहेरी जुनोने येथे गेली होती. तिला दुसरीही मुलगीच झाली. तिथं दोन दिवसांच्या मुक्कामानंतर सूरज रेश्माला घेवून चाळीसगावला परतला. 

दारु पिण्यावरुन आणि मुलगी झाल्यामुळं सतत व्हायची भांडणं

दरम्यान, चाळीसगावात घरी परतल्यावर दोन दिवस उलटले. सकाळी 7 वाजेच्या सुमारास दोन मुलीच झाल्या यावरून त्याचा पत्नी रेश्मासोबत वाद झाला. या वादात त्याने रेश्माच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला. घटनेनंतर सूरज घरातून निघून गेला. घराजवळ गर्दी जमली असतानाच काही वेळातच सूरजने तो राहत असलेल्या परिसरातीलच धुळे रेल्वे लाईनवर रेल्वखाली झोकून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. 

दोन चिमुकल्यांचे मातृपितृ छत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ

रेश्माच्या नातेवाईकांनी घटनास्थळ गाठून खात्री केली असता मयत हा सूरज हाच असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी मयत रेश्मा हिचे नातेवाईक प्रताप शांताराम गायकवाड रा. जुनोने ता.जि.धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पत्नीची हत्या आणि नंतर पतीनं केलेल्या आत्महत्या या घटनेने चाळीसगाव शहर हादरले आहे. तर दुसरीकडे दोन चिमुकल्यांचे मातृपितृ छत्र हरपल्याने सर्वत्र या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक बिरारी करीत आहे.

ही बातमी देखील वाचा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attcked Update : सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून 35 पथकांची स्थापना, 20 लोकल तर 15 क्राईम ब्रांच पोलिसांची पथकंSaif Ali Khan Doctors : फक्त 2MM ने वाचला ⁠सैफ अली खान! हल्ल्याबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 17 January 2025Dhananjay Deshmukh : ...म्हणून मी आज जबाब नोंदवणार नाही, धनंजय देशमुखांनी स्वतः सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Khel Ratna And Arjuna Awards : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Ahilyanagar Crime :  नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
Embed widget