एक्स्प्लोर

Shraddha Murder Case: "श्रद्धाला मारायचा कट आधीच रचलेला, अजिबात पश्चाताप नाही"; पॉलिग्राफ चाचणीत आफताबनं केले धक्कादायक खुलासे

Shraddha Murder Case: श्रद्धाला मारायचा कट आधीच रचला होता, अशी स्पष्ट कबुली आरोपी आफताब पूनावालाने पॉलिग्राफ चाचणीत दिली आहे. या चाचणीत अनेक गोष्टींचाही उलगडा त्याने केली.

Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांडातील (Shraddha Walker Case) आरोपी  आफताब पूनावालाची (Aftab Poonawalla) पॉलिग्राफ चाचणी करण्यात आली. या चाचणीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एफएसएलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबाने पॉलिग्राफ चाचणीत आपला गुन्हा कबूल केला आहे. पॉलीग्राफ चाचणीच्या वेळीही आफताबच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती अथवा केलेल्या गुन्ह्याबद्दल पश्चाताप दिसत नव्हता, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पॉलिग्राफ चाचणीच्या वेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना आफताबने श्रद्धाची हत्या केली असल्याची बाब कबूल केली. खूप आधीच श्रद्धाची हत्या करायची होती, असेही त्याने म्हटले. श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून जंगलात फेकले असल्याची कबुली आफताबने दिली. श्रद्धाशिवाय, इतर काही मुलींसोबत आपले संबंध होते याची कबुलीदेखील आफताबने दिली. 

पॉलीग्राफ चाचणी करणाऱ्या तज्ज्ञांनी आफताबला काही प्रश्ने विचारली. या प्रश्नांना आफताबने अशा प्रकारे उत्तरे दिली.

प्रश्न- तुम्ही श्रद्धाची हत्या केली का?

आफताब- हो

प्रश्न- 18 मे रोजी हत्या झाली होती का?

आफताब- हो

प्रश्न- तुम्ही शरीराचे अवयव जंगलात फेकले का?

आफताब- हो

प्रश्न- तुम्ही श्रद्धाला मारण्याचा कट आधीच केला होता का?

आफताब- हो

प्रश्न- तुम्हाला श्रद्धाला मारल्याचा पश्चाताप होतोय का?

आफताब - नाही

प्रश्न- श्रद्धाला मारण्याच्या उद्देशाने तुम्ही तिला दिल्लीत आणले होते का?

आफताब- हो

प्रश्न- तुम्ही श्रद्धाची हत्या केल्याचे तुमच्या घरच्यांना माहीत होते का?

आफताब- नाही

आफताबने या दरम्यान, पोलिसांना हत्याकांडाशी निगडीत सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर, तज्ज्ञांकडून पॉलिग्राफ चाचणीचा अंतिम अहवाल तयार करण्यात येत आहे. हत्याकांडाशी निगडित अनेक गोष्टीचा उलगडा होण्यास या चाचणीची पोलिसांना मदत होणार असल्याचे म्हटले जात आहे. 

पॉलिग्राफ चाचणीनंतर आता आरोपी आफताबची गुरुवारी, एक डिसेंबर रोजी नार्को चाचणी होणार आहे. पॉलिग्राफ चाचणी आधी आफताबची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती.  

दरम्यान, श्रद्धा हत्याकांडाच्या तपासाच्या अनुषंगाने दिल्ली पोलिसांचे एक पथक वसईमध्ये येऊन गेले. यावेळी त्यांनी आफताब आणि श्रद्धाचे नातेवाईक, परिचीत, मित्र-मैत्रिणींची चौकशी केली होती. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget