एक्स्प्लोर

Hyderabad Gang Rape Case : हैदराबाद सामूहिक अत्याचार प्रकरणातील सर्व पाच आरोपी अटकेत, तीन आरोपी अल्पवयीन, राजकीय कनेक्शन उघड

Hyderabad Gang Rape Case : हैदराबादमधील जुबली हिल्स येथील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार प्रकरणातील सर्व पाचही आरोपींनी अटक करण्यात आली आहे.

Hyderabad Gang Rape Case : हैदराबादमधील मर्सिडीज कारमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील सर्व पाच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींमधील तीन आरोपी अल्पवयीन असल्याचं उघड झालं आहे. या सामूहिक अत्याचार प्रकरणाचे राजकीय संबंध असल्याचंही समोर येत आहे. या आरोपींमध्ये एका आमदाराच्या मुलांचाही समावेश आहे. तर इतरही आरोपी हायप्रोफाईल असल्याचं म्हटलं जात आहे. 

हैदराबाद येथी जुबली हिल्स या उच्चभ्रू वस्तीत मर्सिडीज कारमध्ये अल्पवयीन मुलीवर महाविद्यालयीन मुलांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात आधी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आता इतर तीन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात आता सर्व पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

पीडितेच्या वडिलांनी जुबली हिल्स पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली. त्यानुसार, 28 मे रोजी त्यांची मुलगी एका पार्टीला गेली होती. अॅम्नेशिया अँड इन्सोम्निया पब, रोड नंबर 36, जुबली हिल्स इथे मुलीचे मित्र सूरज आणि हादी यांनी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यांनी या पार्टीसाठी तिला आमंत्रित केलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेसोबत पार्टीमध्ये एका आमदाराचा मुलगा आणि अल्पसंख्याक मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते. सध्या पीडितेने फक्त एका आरोपीची ओळख पटवून त्याचं नाव सांगितलं आहे. हा आरोपीही अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येत आहे.

पीडितेच्या वडिलांनी सांगितलं की, संध्याकाळी 5.30 च्या सुमारास काही लोक माझ्या मुलीला लाल रंगाच्या मर्सिडीज कारमधून पबच्या बाहेर घेऊन गेले. यादरम्यान एक इनोव्हा कारही बाहेर आली. कारमधील लोकांनी माझ्या मुलीशी गैरवर्तन केलं. तेव्हापासून माझी मुलगी शॉकमध्ये आहे. सध्या तिच्या संपूर्ण घटनेचा खुलासा करू शकलेली नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Cyber Crime : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
Digital Arrest : आधार-पॅन कार्डचा मनी लॉड्रिंगमध्ये वापर, सुप्रीम कोर्टचे वॉरंट... डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कोट्यवधी लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
आधार-पॅन कार्डचा मनी लॉड्रिंगमध्ये वापर, सुप्रीम कोर्टचे वॉरंट... डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कोट्यवधी लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget