(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Crime : पत्नी आणि तिच्या वकिलाच्या हत्येची सुपारी देणारा चिंतन उपाध्याय दोषी, शनिवारी शिक्षा सुनावणार
Hema Upadhyay Murder Case : सन 2015 च्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने आरोपी चिंतन उपाध्यायला दोषी ठरवले आहे.
मुंबई: हेमा उपाध्याय (Hema Upadhyay Murder Case) आणि त्यांचे वकील हरिष भंबानी यांच्या हत्या केल्याच्या आरोपांतील मुख्य आरोपी आणि हेमाचा पती चिंतन उपाध्यायसह (Chintan Upadhyay) अन्य आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाने आज दोषी ठरवलं. मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालय (Dindoshi Session Court) सर्व आरोपींच्या शिक्षेवर शनिवारी निकाल देण्याची शक्यता आहे. चिंतन उपाध्यायसह प्रदीप राजभर, शिवकुमार राजभर आणि विजय राजभरवर हत्या आणि मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. सरकारी वकिलांनी या क्रूर हत्येसाठी चिंतन उपाध्याय, प्रदीप राजभर, शिवकुमार राजभर आणि विजय राजभर यांच्याकरता फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे.
Hema Upadhyay Murder Case : काय आहे प्रकरण?
स्वत: एक आंतरराष्ट्रीय दर्जचा उत्तम चित्रकार असलेला चिंतन हा 'मांडणी शिल्पकार' म्हणजेच इन्स्टॉलेशन आर्टिस्ट हेमा उपाध्याय यांचा पती होता. त्यांच्या घटस्फोटाचं प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात सुरू असतानाच हेमा व त्यांचे वकील हरीष भंबानी यांची 11 डिसेंबर 2015 रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या दोघांचे मृतदेह टेपमध्ये गुंडाळून खोक्यांमध्ये भरलेल्या अवस्थेत दुसऱ्या दिवशी कांदिवलीमधील डाहाणूकरवाडी परिसरातील नाल्यात सापडल्यानंतर दुहेरी हत्याकांडाचा हा प्रकार उघडकीस आला होता.
चिंतननं आपला कारागिर विद्याधर राजभर आणि त्याच्या अन्य सहकाऱ्यांना या दोघांच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप होता. त्या आरोपाखाली चिंतनला अटक झाली होती. मुंबई सत्र न्यायालय आणि हायकोर्टानं जामीन नाकारल्यानंतर अखेर साल 2021 मध्ये चिंतनला जामीन मंजूर केला आहे. तर या हत्याकांडातील मुख्य मारेकरी विद्याधर राजभर हा अद्याप फरार आहे. एक कुशल कारागिर असलेला विद्याधर हा नेपाळमार्गे परदेशात पसार झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
ही बातमी वाचा :