एक्स्प्लोर

Gondia Crime News : धक्कादायक! मोबाईलचा स्फोट होऊन शिक्षकाचा मृत्यू, शेजारी असलेला व्यक्ती सुद्धा जखमी

Gondia Crime News, Person dies due to mobile explosion  : मोबाईलचा स्फोट होऊन गोंदियातील एका शिक्षकाचा मृत्यू झालाय.

Gondia Crime News, Person dies due to mobile explosion  :  खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्यानं त्यात गंभीर जखमी होऊन शिक्षकाचा मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला नातेवाईक गंभीर जखमी झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगाव बांध इथं सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. सुरेश संग्रामे (वय 55) असं मृतक शिक्षकाचं नाव आहे. तर नत्थु गायकवाड (56) असं गंभीर जखमी असलेल्या इसमाचं नाव आहे. मृतक सुरेश संग्रामे आणि गंभीर जखमी नत्थु गायकवाड हे नातेवाईक असून दोघेही भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सिरेगावटोला येथील रहिवासी आहेत. दोघेही नातेवाईकाच्या एका कार्यक्रमासाठी अर्जुनी मोरगावकडं निघाले असताना ही घटना घडली. गंभीर जखमी नत्थु गायकवाड यांच्यावर सध्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मोबाईलचा स्फोट होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्याल? 

मोबाईलचा स्फोट होऊ नागरिकांचा जीव जाणे किंवा जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. बहुसंख्यजण मोबाईल वापरताना काही चूका करत असतात. कंपनीने म्हणजेच प्रोप्रायटरने उपलब्ध करुन दिलेल्या चार्जरशिवाय मोबाईल चार्ज करणं धोकादायक असू शकतं. मोबाईल एका कंपनीचा आणि त्याला चार्जर तिसराच वापरणे, हे देखील धोकायदायक ठरु शकते. 

दैनंदिन जीवनात स्मार्टफोनचा वापर जीवघेणा ठरु शकतो. हे प्रकर्षाने समोर येऊ लागले आहेत. मोबाईलचा स्फोट होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरु शकतात? मोबाईलचा स्फोट होऊ नये, यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? याबाबत जाणून घेऊयात.. 

मोबाईलच्या बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट शक्यता देखील असते

मोबाईलचा स्फोट होण्याच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट म्हणजेच फोन तयार करण्यात येताना झालेल्या चूका हे आहे. हँडसेटमध्ये पॉवर देणारी बॅटरी फिट करत असताना तिची योग्य चाचणी करणे गरजेचे असते. याशिवाय असेंबली लाईनमधील बिघाडामुळे मोबाईलचा स्फोट होऊ शकतो. बाहेरचं वाढलेलं तापमान, जास्त प्रमाणा केलेली चार्जींग, किंवा खराब पद्धतीने बनवण्यात आलेल्या फोनचा स्फोट होऊ शकतो. याशिवाय महत्त्वाचं म्हणजे मोबाईलच्या बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट शक्यता देखील असते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pune Crime News: इंदापुरात चाकूने सपासप वार करुन विवाहितेचा निर्घृण खून, निमगांव केतकी गाव हादरलं, आरोपी अटकेत

Gurudwara of Nanded : 94 किलो दागिने वितळवून झाले 48 किलो, गुरुद्वारात आलेल्या दानरुपी दागिन्यांमध्ये गैरव्यवहार, न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लातूरमधील तळेगावच्या 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा,  शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
लातूरमधील तळेगावच्या 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा,  शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
तेव्हा एकत्र आर आर आबा आणि अनिल भाऊंची एन्ट्री अन् आता त्यांच्याच लेकरांची आमदार म्हणून एन्ट्री! नव्वदीचा योगायोग चर्चेत
तेव्हा एकत्र आर आर आबा आणि अनिल भाऊंची एन्ट्री अन् आता त्यांच्याच लेकरांची आमदार म्हणून एन्ट्री! नव्वदीचा योगायोग चर्चेत
ईव्हीएमविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक; पराभूत उमेदवाराच्या शहरातून निघेल पहिला 'मशाल मोर्चा'
ईव्हीएमविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक; पराभूत उमेदवाराच्या शहरातून निघेल पहिला 'मशाल मोर्चा'
Surabhi Hande : सुरभी हांडे 10 वर्षांनी पुन्हा म्हाळसाच्याच भूमिकेत! 'आई तुळजाभवानी' मालिकेत अभिनेत्रीची एन्ट्री
सुरभी हांडे 10 वर्षांनी पुन्हा म्हाळसाच्याच भूमिकेत! 'आई तुळजाभवानी' मालिकेत अभिनेत्रीची एन्ट्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jyoti Gaikwad - Varsha Gaikwad : वर्षा गायकवाडांची बहीणीसोबत एन्ट्री,वडिलांच्या आठवणीने डोळे पाणावलेAbu Azmi Left MVA : विरोधकांचा आमच्याशी काही संबंध नाही, अबू आझमींचा मविआवर गंभीर आरोपSudhir Mungantiwar And Bhaskar Jadhav : सुधीर मुनगंटीवार विधानभवनात दाखलSudhir Mungantiwar And Bhaskar Jadhav Video:हातात हात घालून जाधव- मुनगंटीवार यांची विधानभवनात एँट्री

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लातूरमधील तळेगावच्या 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा,  शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
लातूरमधील तळेगावच्या 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा,  शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
तेव्हा एकत्र आर आर आबा आणि अनिल भाऊंची एन्ट्री अन् आता त्यांच्याच लेकरांची आमदार म्हणून एन्ट्री! नव्वदीचा योगायोग चर्चेत
तेव्हा एकत्र आर आर आबा आणि अनिल भाऊंची एन्ट्री अन् आता त्यांच्याच लेकरांची आमदार म्हणून एन्ट्री! नव्वदीचा योगायोग चर्चेत
ईव्हीएमविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक; पराभूत उमेदवाराच्या शहरातून निघेल पहिला 'मशाल मोर्चा'
ईव्हीएमविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक; पराभूत उमेदवाराच्या शहरातून निघेल पहिला 'मशाल मोर्चा'
Surabhi Hande : सुरभी हांडे 10 वर्षांनी पुन्हा म्हाळसाच्याच भूमिकेत! 'आई तुळजाभवानी' मालिकेत अभिनेत्रीची एन्ट्री
सुरभी हांडे 10 वर्षांनी पुन्हा म्हाळसाच्याच भूमिकेत! 'आई तुळजाभवानी' मालिकेत अभिनेत्रीची एन्ट्री
त्यांचे लाखोंनी चाहते, भेटण्यासाठी फॅन्स झुरायचे, 'असे' चार ॲक्टर्स ज्यांच्या मृत्यूचं रहस्य कोणालाच माहिती नाही!
त्यांचे लाखोंनी चाहते, भेटण्यासाठी फॅन्स झुरायचे, 'असे' चार ॲक्टर्स ज्यांच्या मृत्यूचं रहस्य कोणालाच माहिती नाही!
राज्यात बनावट औषध पुरवठ्याच्या बोगसगिरीची भांडाफोड, आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, वाचा स्पेशल रिपोर्ट
राज्यात बनावट औषध पुरवठ्याच्या बोगसगिरीची भांडाफोड, आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, वाचा स्पेशल रिपोर्ट
Vinod Kambli Love Story : रिसेप्शनिस्ट नोएला लुईस ते फॅशन मॉडेल अँड्रिया हेविटपर्यंत! विनोद कांबळीच्या व्यक्तीगत आयुष्यातील प्रेमाची सुद्धा शोकांतिका
रिसेप्शनिस्ट नोएला लुईस ते फॅशन मॉडेल अँड्रिया हेविटपर्यंत! विनोद कांबळीच्या व्यक्तीगत आयुष्यातील प्रेमाची सुद्धा शोकांतिका
भगवद्गगीता घेऊन भाजप आमदाराची शपथ; काँग्रेस खासदार संतापल्या, संविधानाची करुन दिली आठवण
भगवद्गगीता घेऊन भाजप आमदाराची शपथ; काँग्रेस खासदार संतापल्या, संविधानाची करुन दिली आठवण
Embed widget