एक्स्प्लोर

Gondia News : अज्ञात हल्लेखोरांच्या हल्ल्यात जखमी प्रॉपर्टी डीलरचा उपचरादरम्यान मृत्यु; मारेकरी मात्र अद्याप फरारच 

गोंदिया शहरातील एका प्रॉपर्टी डीलरवर काही अज्ञात मारेकर्‍यांनी प्राणघातक हल्ला केला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली असून यात जखमी प्रॉपर्टी डीलरचा उपचरादरम्यान आज मृत्यु झालाय.

Gondia News गोंदियागोंदिया शहरातील प्रॉपर्टी डीलर महेश दखने (वय 35 वर्ष) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला चढवला होता. यात महेश दखने गंभीर जखमी झाले होते. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली असून संपूर्ण गोंदिया (Gondia News) शहर या हत्येच्या घटनेने हादरलाय. ही घटना रविवारी किसान चौक छोटा गोंदिया येथे घडली होती. गोंदिया शहरातील महेश दखने हे आपल्या टू व्हीलर गाडीने जात असतांना अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करत डोक्याच्या मागच्या बाजूला हातोडा, कुऱ्हाडी, तलवार आदी हत्याराने वार केले होते.

गंभीर जखमी महेश दखने यांना बेशुद्ध अवस्थेत डॉ. बाहेकर यांच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, बराच वेळ पडून राहिल्याने आणि जास्त रक्तस्त्राव झाल्याने महेश दखणे यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच अखेर आज सकाळी त्यांचा मृत्यु झालाय. तर या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली असून आरोपींच्या शोधात तीन पोलीस पथक रवाना झाली आहेत.

अज्ञात हल्लेखोरांच्या हल्ल्यात जखमी प्रॉपर्टी डीलरचा उपचरादरम्यान मृत्यु

गोंदिया शहरातील किसान चौक (छोटा गोंदिया) येथे जान्हवी ऑटो रिपेअरिंग सेंटर जवळ रविवारच्या सकाळी 9.45 वाजताच्या सुमारास शहरातील  प्रॉपर्टी डीलर महेश दखने यांच्यावर हल्ला करण्यात आला. वर्दळीच्या रस्त्यावर अचानक झालेला आरडाओरडा ऐकून काही लोक मारेकऱ्यांच्या मागे धावले, मात्र हल्लेखोर तोपर्यंत पळून गेले होते. दरम्यान बघ्यांची एकच गर्दी जमली पण त्यांना तात्काळ दवाखान्यात नेण्याची तसदी कोणी घेतली नाही.

मारेकरी अद्याप फरारच 

दरम्यान वाचन खंदारे नामक एका व्यक्तीने फोन करून या प्रकरणाची माहिती माजी नगरसेवक लोकेश कल्लू यादव यांना दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून गंभीर जखमी महेश दखणे यांना बेशुद्ध अवस्थेत डॉ. बहेकर यांच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, अतिरक्तस्त्राव झाल्याने आणि गंभीर जखमी असल्याने आज अखेर उपचार दरम्यान महेश दखने यांचा मृत्यु झालाय. मात्र, दुसरीकडे या हल्ल्यातील मारेकरी अद्याप फरारच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या मारेकऱ्यांचा शोध घेणे आता पोलीसांपुढे आव्हान असणार आहे. तर गोंदिया शहर पोलिसांनी पथके तयार करून पुढील तपास सुरू केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
ZP Result 2026 LIVE: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
Raigad ZP Elections Results 2026: रायगड जिल्हा परिषदेत गोगावले गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार का? कोणाची सत्ता येणार?
रायगड जिल्हा परिषदेत गोगावले गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार का? कोणाची सत्ता येणार?
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
ZP Result 2026 LIVE: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
Raigad ZP Elections Results 2026: रायगड जिल्हा परिषदेत गोगावले गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार का? कोणाची सत्ता येणार?
रायगड जिल्हा परिषदेत गोगावले गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार का? कोणाची सत्ता येणार?
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Embed widget