एक्स्प्लोर

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याला अवघ्या 24 तासात जामीन मंजूर; न्याय मागणाऱ्या तरुणीला शरीरसुखाची केली होती मागणी

तरुणीला शरीरसुखाची मागणी करून तिचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप भंडाऱ्याचे पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांच्यावर आहे. मात्र त्यांना आता भंडारा पोलीस ठाण्यातून अवघ्या 24 तासात जामीन मंजूर झालाय.

Bhandara News भंडारा : न्याय मागण्यासाठी गेलेल्या तरुणीला शरीरसुखाची मागणी करून तिचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप  भंडाऱ्याचे (Bhandara) उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांच्यावर आहे. या प्रकरणात बागुल यांच्यावर भंडारा पोलीस (Bhandara Police) ठाण्यात 7 जूनला भादंवी 354 अ (2), 509 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद असलेल्या पोलीस विभागानं एवढ्या गंभीर आरोपानंतर DYSP बागुल यांना अवघ्या 24  तासात भंडारा पोलीस ठाण्यातून जामिनावर सोडलं असल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गुन्हा दाखल झाल्यानंतर DYSP डॉ. अशोक बागुल हे आता वैद्यकीय रजेवर गेले आहेत. या घटनेचा संपूर्ण अहवाल पोलीस महानिरीक्षकांकडं पाठविला असल्याची माहिती भंडारा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिली. त्यामुळे आता भंडाऱ्याचा प्रभार तुमसरच्या IPS रष्मिता राव यांच्याकडं सोपविण्यात आला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याला अवघ्या 24 तासात जामीन मंजूर

प्रेमप्रकरणातील वादात प्रियकराविरुद्ध तक्रार करायला गेलेल्या एका तरुणीला चक्क वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यानेच शरीर सुखाची मागणी केल्याची संतापजनक घटना घडली होती. हा खळबळजनक प्रकार भंडाऱ्यात (Bhandara)घडला असून तक्रारदार तरुणीच्या तक्रारीनंतर भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीसाठी गेल्यावर डॉ. अशोक बागुल यांनी शरीर सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणीने केला होता. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी बागुल यांच्या विरोधात उशिरा भंडारा पोलिसात (Bhandara Police) भादंवी कलम 354 A (2), 509 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामुळं पोलीस प्रशासनात मात्र मोठी खळबळ उडाली होती. 

न्याय मागणाऱ्या तरुणीला शरीरसुखाची केली होती मागणी

या प्रकरणातील 25 वर्षीय तक्रारकर्त्या पीडित तरुणी ही भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील असून ती उच्च शिक्षित (इलेक्ट्रिक इंजिनियर) आहे. नागपूरला शिक्षण घेत असताना त्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या गडचिरोली येथील एका तरूणासोबत प्रेम संबंध जूळले. सात वर्षांपासून या दोघांचे प्रेमसंबंध असल्यानं तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, लग्नाचा विषय काढल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्याची तक्रार दाखल करण्याकरिता पीडित तरुणी ही 1 जूनला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांच्या कार्यालयात गेली होती.

विनयभंगाचा गुन्हा दाखल

दरम्यान, केबिनमध्ये पीडितेला बसवून, तू सुंदर आहे. तू आत्महत्या करू नकोस. मी तुझ्यासोबत आहे. मी तुला मदत करतो. पण माझी एक अट आहे. तू आणि मी एकदम क्लोज फ्रेंड बनू. तुझं आयुष्य बदलवून टाकेन. तू सुशिक्षित आणि सुंदर आहे. मी अजूनही तरुण आहे. आपण डेट वर जावू. तू मला त्यासाठी मदत करं. मी तुला कधीच एकटी सोडणार नाही. माझ्या वयावर जावू नकोस. मी तुला आयुष्यभर सांभाळतो. हे तू कोणाला सांगू नकोस. अशी भावना 56 वर्षीय डॉ. अशोक बागुल यांनी पीडितेजवळ व्यक्त केल्याचे पीडित तरुणीचे म्हणणे आहे. मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल  यांना अवघ्या 24  तासात भंडारा पोलीस ठाण्यातून जामिनावर सोडलं असल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Palghar Accident News: पालघरमध्ये भीषण अपघात, मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, पोलिसांच्या भीतीने पळताना अपघात? नातेवाईकांचा गंभीर आरोप
पालघरमध्ये भीषण अपघात, मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, पोलिसांच्या भीतीने पळताना अपघात? नातेवाईकांचा गंभीर आरोप
Mumbai News: डॉक्टर ऑपरेशनसाठी आल्याच नाहीत; फोनाफोनी, शोध अन् रुग्णालयात धावाधाव, त्यांच्या केबिनमध्ये पाहिलं, जमिनीवर पडलेला मृतदेह, मुंबईतील घटना
डॉक्टर ऑपरेशनसाठी आल्याच नाहीत; फोनाफोनी, शोध अन् रुग्णालयात धावाधाव, त्यांच्या केबिनमध्ये पाहिलं, जमिनीवर पडलेला मृतदेह, मुंबईतील घटना
Beed Crime: सरपंच संतोष देशमुखांना हालहाल करुन मारणाऱ्या जयराम चाटेच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, तुरुंगाबाहेर पडताच काय घडलं?
संतोष देशमुखांना हालहाल करुन मारणाऱ्या जयराम चाटेच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, तुरुंगाबाहेर पडताच काय घडलं?

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
Iran : अमेरिकेनं रशियन तेलाची आयात नको यासाठी महिने घालवले, रशियाचं तेल घ्या म्हणून भारतासह जगाला विणवण्या, इराणच्या विदेश मंत्र्यांचं ट्रम्प यांच्या वर्मावर बोट
अमेरिका भारतासह जगाला रशियन तेल खरेदीसाठी विणवण्या करतेय, इराणच्या विदेश मंत्र्यांचा हल्लाबोल
इकडं इराणचा संयुक्त अरब अमिरातीला गर्भित इशारा अन् तिकडं लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी युरोपमधून पहिला आवाज; थेट मध्यस्थीची तयारी दाखवत ठिकाण सांगितलं, तोडगा निघणार?
इकडं इराणचा संयुक्त अरब अमिरातीला गर्भित इशारा अन् तिकडं लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी युरोपमधून पहिला आवाज; थेट मध्यस्थीची तयारी दाखवत ठिकाण सांगितलं, तोडगा निघणार?
पीएम मोदींच्या रॅलीपूर्वी बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांवर तुफान दगडफेक
पीएम मोदींच्या रॅलीपूर्वी बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांवर तुफान दगडफेक
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
Gold Silver Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चांदीच्या दरात घसरण कायम, दागिने खरेदीची मोठी संधी, मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
सोने चांदीच्या दरात घसरण कायम, दागिने खरेदीची मोठी संधी, मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Sangli IPS officer UPSC Exam: सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर
सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
Embed widget