Gondia News : लाचखोर लेखापाल अडकला एसीबीच्या जाळ्यात; अवघ्या अडीच हजारांची लाच घेणं भोवलं
Gondia Crime News : गोंदियाच्या गोरेगाव येथील तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयातील कंत्राटी लेखापाल याला अडीच हजार रुपयाची लाच घेताना (Bribe) रंगेहात अटक करण्यात आली आहे.
Gondia News गोंदिया : गोंदियाच्या गोरेगाव येथील तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयातील कंत्राटी लेखापाल याला अडीच हजार रुपयाची लाच घेताना (Bribe) रंगेहात अटक करण्यात आली आहे. कंत्राटी आरोग्य सेविका यांच्याकडून प्रोत्साहन भत्ता काढून देण्यासाठी ही लाच घेत असल्याचे तपासात उघड झाले आहे. ही कारवाई गुरुवारी 1 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (Anti Corruption Buero) गोंदियाच्या पथकाने केलीय. गोरेगाव येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले लेखापाल (कंत्राटी)सुरेश रामकिशोर शरणागत (वय 36) असे लाचखोर लेखापालाचे नाव आहे. तर अवघ्या अडीच हजारांची लाच घेणं लेखापाला भोवलं असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अवघ्या अडीच हजारांची लाच घेणं लेखापालला भोवलं
या प्रकरणातील तक्रारदार या तालुक्यातील चोपा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या गिधाडी येथील उपकेंद्रात कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे. त्यांना शासनाकडून 16 हजार 500 रूपयाचे ईंसेंटीव्ह (प्रोत्साहन भत्ता) देण्यात येणार होता. दरम्यान, त्यांनी संशयित आरोपी लेखापाल यांच्याकडे सदर प्रोत्साहन भत्ता काढून देण्याकरीता विनंती केली होती. मात्र, संशयित आरोपीने सदर प्रोत्साहन भत्ता काढून दिल्याच्या मोबदल्यात फिर्यादीकडे 3 हजार रूपये लाचेची मागणी केली.
परंतू तक्रारदार यांना लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार नोंदवली. या अनुषंगाने पथकातर्फे मंगळवार (ता.1) सापळा रचत कारवाई केली असता लाच मागणी पडताळणी दरम्यान संशयित आरोपीला पंचासमक्ष तडजोडीअंती 2 हजार 500 रूपयाची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
या प्रकरणातील कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलीस अधीक्षक सचीन कदम, पर्यवेक्षक अधिकारी पोलीस उप अधीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उमाकांत उगले, पोलीस निरीक्षक अतुल तवाडे, सहायक फौजदार करपे, पोलीस हवालदार संजयकुमार बोहरे, मंगेश काहालकर, नायक पोलीस शिपाई संतोष शेंडे, संतोष बोपचे, कैलास काटकर अशोक कापसे, प्रशांत सोनवाने, महिला नायक पोलीस शिपाई संगीता पटले, रोहिणी डांगे, चालक नायक पोलीस शिपाई दिपक बाटबर्वे यांनी केली.
रेल्वेच्या धडकेत सरपंचाचा मृत्यू
गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील गणखैरा ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष आदमणे यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. गोंदिया- बल्लारशाह रेल्वे मार्गावरील गणखेरा रेल्वे स्थानक परीसरात ही घटना घडली. संतोष आदमणे हे गाणखेरा ग्रामपंचायतीचे सरपंच होते. गोंदिया-गणखैरा रेल्वे मार्गाजवळ संतोषची शेती असल्याने शेतीची कामे सुरू होती. दरम्यान, चंद्रपूर रेल्वे मार्गावरून गोंदियाच्या दिशेने मालगाडी जात असताना संतोष याला रेल्वेने धडक दिली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला
इतर महत्वाच्या बातम्या
- मिटकरी हे राजकारणातील राखी सावंत, मनसे जिल्हाध्यक्षाची बोचरी टीका; मिटकरी-मनसेतील वाद थांबता थांबेना