एक्स्प्लोर

शालेय पोषण आहार बनवणाऱ्या व्यक्तीनं केलं चिमुकलीसोबत असं काही कृत्य, घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला

अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या शाळेत एक धक्कादायक प्रकार घडलाय. ज्यामध्ये एका 52 वर्षीय शालेय पोषण आहार बनवणाऱ्या व्यक्तीनं शाळेत शिकणाऱ्या 9 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय.

Akola News अकोला : अकोला जिल्ह्यातून अतिशय मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत एक धक्कादायक प्रकार घडलाय. ज्यामध्ये एका 52 वर्षीय शालेय पोषण आहार बनवणाऱ्या व्यक्तीनं जिल्हा परिषदच्या शाळेत शिकणाऱ्या 9 वर्षीय मुलीवर अत्याचार (Akola Crime News) करण्याचा प्रयत्न केलाय. अकोला शहरातल्या गुडधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात अकोला शहरातल्या सिव्हिल पोलीस ठाण्यात शालेय पोषण आहार मदतणीस म्हणून कार्यरत असलेल्या चंद्रमणी चव्हाण याच्याविरुद्ध बाल संरक्षण कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आलाय. दरम्यान, चंद्रमणी चव्हाण हा शाळेच्या भिंतीवरून उडी मारून पळाला असल्याची माहिती समोर आली आहे.

9 वर्षीय मुलीवर अत्याचार

विदर्भातील हजारो शाळा 1 जुलैपासून सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांच्या शाळेच्या  पहिला दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी स्मरणीय ठरला. यात काही शाळांनी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे फुलं देऊन स्वागत केले. तर काही शाळांनी पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगळे कार्यक्रम ठेवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मात्र, अकोल्यात  शाळा उघडताच चौथ्या दिवशी एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. अकोला शहरातल्या गुडधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार बनवणाऱ्या व्यक्तीनं 9 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय. चंद्रमणी चव्हाण असे या व्यक्तीचे नाव असून तो गेल्या अनेक वर्षापासून शाळेत शालेय पोषण आहार बनवण्यासाठी कार्यरत होता. 

शाळेच्या भिंतीवरून उडी मारून संशयित आरोपीचा पळ

दरम्यान, 4 जुलै रोजी चंद्रमणी चव्हाण याने शाळेत शालेय पोषण आहार वाटत असताना पीडित मुलीला एका खोलीत नेलं. त्यानंतर त्याने तीचा विनयभंग करत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या 9 वर्षीय मुलीने आरडो ओरड करत संधी मिळताच घटनास्थळावरुन पळ  काढला. या घटनेने भयभीत झालेली विद्यार्थीनी परत शाळेतच गेली नाही. त्यानंतर तीच्या कुटुंबियांनी तीची विचारणा केली असता, तीने तिच्या सोबत घडलेला संपूर्ण घटनाक्रम कुटुंबियांना सांगीतला. त्यानंतर संतप्त  कुटुंबियांनी तात्काळ शाळेत भेट देत एकच गोंधळ घातला. तर दुसरीकडे ही बाब चंद्रमणी चव्हाणला कळताच त्याने शाळेतून पळ काढला. सध्या पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चंद्रमणी चव्हाण याच्याविरुद्ध बाल संरक्षण कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच फरार चंद्रमणी चव्हाणचा शोध पोलीस करत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
Parbhani Crime : 25 हजारांच्या खंडणीसाठी दिवसाढवळ्या विद्यार्थ्याचं अपहरण, रेल्वे उड्डाणपुलावरुन खाली फेकलं
25 हजारांच्या खंडणीसाठी दिवसाढवळ्या विद्यार्थ्याचं अपहरण, रेल्वे उड्डाणपुलावरुन खाली फेकलं
नाशिक हादरलं! भर रस्त्यात महिलेने एका व्यक्तीला संपवलं, घटनेचा व्हिडीओ समोर 
नाशिक हादरलं! भर रस्त्यात महिलेने एका व्यक्तीला संपवलं, घटनेचा व्हिडीओ समोर 
ED Raid On Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी पार्श्वगायिका आशा भोसले अनंतात विलीन
Mumbai Asha Bhosle Funeral : आशाताईंचं निधन, कुटुंबीयांना अश्रू अनावर, सचिन तेंडुलकरही हळहळला..
Yavatmal Water Issue : पाण्यासाठी वणवण, लालफितीची अडचण Special Report
Ashok Kharat Case : कारनामे नवीन कोट्यवधींची जमीन, कल्पना खरात अजूनही फरार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
ED Raid On Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
Gujarat Election :  एकच उमेदवार तीन पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात, गुजरातमध्ये अनोखा प्रकार, उमेदवार नेमका कोणत्या पक्षाचा , भाजप, आप की काँग्रेस
एकच उमेदवार तीन पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात,उमेदवार नेमका कोणत्या पक्षाचा , भाजप, आप की काँग्रेस?
Pope Leo on Donald Trump: विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा बुद्ध्यांक काढणारे ट्रम्पची 16 वे पोप लिओ यांच्यावरही सडकून टीका; पोप लिओ यांनी सुद्धा घाबरत नाही म्हणत स्पष्ट शब्दात ठणकावलं
विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा बुद्ध्यांक काढणारे ट्रम्पची 16 वे पोप लिओ यांच्यावरही सडकून टीका; पोप लिओ यांनी सुद्धा घाबरत नाही म्हणत स्पष्ट शब्दात ठणकावलं
RBI : आरबीआयकडून महाराष्ट्रातील एका बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध, पैसे काढणे, ठेवी स्वीकारण्यास मनाई, कारण समोर
RBI कडून महाराष्ट्रातील एका बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध, पैसे काढणे, ठेवी स्वीकारण्यास मनाई, कारण समोर
Iran War: अमेरिकेची चीनला पहिल्यांदा 50 टक्के टॅरिफ लादण्याची धमकी, आता तेल खरेदीची ऑफर, इराणवरुन ट्रम्प यांचा गोंधळात गोंधळ
अमेरिकेची चीनला पहिल्यांदा 50 टक्के टॅरिफची धमकी, आता तेल खरेदीची ऑफर,ट्रम्प यांचं नेमकं काय सुरु?
Muhoozi Kainerugaba: '1 अब्ज डॉलर्स आणि देशातील सर्वात सुंदर महिला मला बायको म्हणून द्या, अन्यथा पुढील 30 दिवसात..' युगांडाच्या लष्करप्रमुखाची 'नाटो' सदस्य तुर्कीला थेट धमकी
'1 अब्ज डॉलर्स आणि देशातील सर्वात सुंदर महिला मला बायको म्हणून द्या, अन्यथा पुढील 30 दिवसात..' युगांडाच्या लष्करप्रमुखाची 'नाटो' सदस्य तुर्कीला थेट धमकी
Embed widget