घरात काम नाही म्हणून महिलांनी भरवला जुगार अड्डा; सात महिलांना अटक, उल्हासनगरमधील प्रकार
गेल्या अनेक दिवसांपासून महिला जुगार खेळत होत्या. या महिला मोबाईलद्वारे एकमेकांना संपर्क करून एका फ्लॅटमध्ये एकत्र होऊन तीन पत्तीचा जुगार खेळायच्या.
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) कोरोनाच्या काळात महिलांनी एका घरात चक्क जुगाराचे अड्डा भरवला होता. मात्र पोलिसांनी या जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकून जुगाराचा अड्डा उध्वस्त केला असून सात महिलांना अटक केली आहे.
उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरात महिलांच्या जुगाराचे भरला होता. गेल्या अनेक दिवसांपासून महिला जुगार खेळत होत्या. या महिला मोबाईलद्वारे एकमेकांना संपर्क करून एका फ्लॅटमध्ये एकत्र होऊन तीन पत्तीचा जुगार खेळायच्या. ज्या महिलेच्या घरी हा अड्डा होता, त्या महिलेला एक ठराविक मोबदला दिला जायचा.
चाळीशी ओलांडलेल्या या महिलांना घरात जास्त काम नसायचं, म्हणून करायचं काय तर एकीने पुढाकार घेत सर्व महिलांना आपल्या घरी बोलावून तीन पत्तीचा जुगार खेळण्याचा प्लान केला.
यासंबंधी मध्यवर्ती पोलिसांना काही दिवसांपासून याची माहिती मिळत होती, मात्र याची कुणकुण या जुगार खेळणाऱ्या महिलांना सुद्धा झाली. म्हणून त्या रोज फोनवर एकमेकांशी बोलायच्या. मात्र जुगार खेळण्यासाठी एकत्र येत नव्हत्या. अखेर 18 तारखेला या सात महिला संध्याकाळी 4 वाजता एकत्र जमल्या आणि सुरू झाला तीन पत्तीचा जुगार.
पोलिसांनी हीच संधी साधत त्या अड्ड्यावर धाड टाकली. पोलिसांची एन्ट्री होताच सर्व महिला घाबरल्या. त्यांना सुरुवातीला कळलंच नाही की काय झालं. मात्र पोलीसांनी ऑन कॅमेरा धाड टाकली म्हणून या सर्व महिलांची पळापळ झाली. पोलिसांनी या धाडीत या महिलांकडून जुगाराची 47 हजारांची रक्कम जप्त केली.
तसेच जुगार ऍक्ट आणि कोविड प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करत जुगार खेळणाऱ्या सात महिलांना अटक केली आहे. अटक करून कोर्टात हजर केलं असता कोर्टाने या महिलांना जामिनावर सोडून दिल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Covid19 Third Wave : दिलासादायक! भारतात दैनंदिन कोरोनारुग्ण संख्या 4 लाखांच्या पार जाणार नाही : शास्त्रज्ञांचा अंदाज
- Omicron Variant : वाढत्या आजारांचा धोका! ओमायक्रॉन आणि प्रदूषणाचा फुफ्फुसांवर परिणाम
- Covid19 Update : ब्रिटनमध्ये कोरोना निर्बंध उठवले; मास्कची सक्ती नाही, वर्क फ्रॉम होमलाही सुट्टी