धक्कादायक! धावत्या कारमध्ये 19 वर्षीय मॉडेलवर अत्याचार, मैत्रिणीसह चार जणांना अटक
Kerala News : केरळमधील कोचीजवळील कोडुंगल्लूर येथे गुरुवारी रात्री 19 वर्षीय मॉडेलवर सामुहिक बलात्कार करण्यात आला.
Kerala News : वसईमधील श्रद्धा मर्डर केसमुळे देशभरात संतापाची लाट असतानाच केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या कारमध्ये 19 वर्षीय मॉडेलवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. यामध्ये एका मुलीचा देखील समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमधील कोचीजवळील कोडुंगल्लूर येथे गुरुवारी रात्री 19 वर्षीय मॉडेलवर सामुहिक बलात्कार करण्यात आला. पीडितेला तिच्या एका राजस्थानी मैत्रिणीने डीजे पार्टीसाठी आमंत्रित केले होते. कोचीन शिपयार्डजवळील एका पबमध्ये या डीजे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीतच मैत्रिणीने पीडितेची संशयितांसोबत ओळख करून दिली. पार्टी संपल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास पीडितेला घरी सोडण्याच्या निमित्ताने आपल्या कारमध्ये बसवले. मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे तिला घरी सोडण्यासाठी तिची मित्रैण सोबत आली नाही. त्यानंतर तिघा आरोपींनी आधी पीडितेसोला मारहाण केली आणि चालू कारमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यावेळी संशयित मद्यधुंद अवस्थेत होते.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितनुसार, “अत्याचारानंतर पीडितेला संशयितांना कक्कनड या गावात सोडून ते पसार झाले. त्यानंतर मैत्रिणीने तिला उपाचारासाठी रूग्णालयात दाखल केले. यावेळी तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यावेळी ती जखमी झाल्याचे समजले. रुग्णालयाने याबाबत पोलिसांना कळवल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली. सध्या एका खासगी रूग्णालयात पीडितेवर उपचार सुरू आहेत. पोलिस याबाबत कसून चौकशी करत आहेत.
दोषींवर कडक कारवाई होणार
केरळ्या आरोग्य, महिला आणि बालविकास मंत्री वीणा जॉर्ज यांनी दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे सांगितले आहे. "कोचीमध्ये मुलीसोबत झालेल्या सामूहिक बलात्काराची घटना धक्कादायक आहे. आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो. याप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. मुलीवर योग्य उपचार व्हावेत यासाठी मी सूचना दिल्या आहेत, असे जॉर्ज यांनी सांगितले.
दरम्यान, केरळमध्ये अलीकडेच अशाच घटनेत एका पोलिस अधिकाऱ्याना निलंबीत केले असताना ही धक्कादायक घटना घडली आहे. केरळमधील वायनाड येथे अल्पवयीन बलात्कार पीडितेसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी एएसआयला निलंबित करण्यात आले होते. बलात्कार प्रकरणात पुरावे गोळा करण्यासाठी घेऊन जात असताना एएसआयने तिच्याशी गैरवर्तन केले होते. त्यानंतर आपल्यासोबत गैरवर्तन झाल्याची तक्रार पीडितेने केली होती. पीडितेच्या तक्रारीवरून चौकशी करण्यात आली आणि अहवालाच्या आधारे डीआयजींनी एएसआयला निलंबित करण्याचे आदेश दिले.
महत्वाच्या बातम्या