एक्स्प्लोर

Virar News : सर्वांसोबत उभा होता, काही कळण्याच्या आतच खाली कोसळला; ठाण्याच्या माजी जिल्हाप्रमुखांच्या मुलाचा विरारमध्ये संशयास्पद मृत्यू

Virar News : विरारच्या अर्नाळा, नवापूर येथील सेवेन सी रिसॉटमध्ये ठाण्याचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.

Virar News : विरार : विरारमध्ये (Virar) ठाण्याचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरेंना केलेल्या मारहाणीनंतर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विरारच्या अर्नाळा, नवापूर येथील सेवेन सी रिसॉट मध्ये ठाण्याचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे आपल्या कुटुंबासह आले होते. रिसॉर्टच्या गेटमधून गाडी नेताना एका रिक्षाचा धक्का लागून, त्यांची स्थानिकांसोबत भांडणं झाली होती. यात मिलिंदला आणि इतर दोघांनांही मारहाण झाली होती. आणि त्यानंतर मिलिंदला चक्कर आल्याने त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी मृत घोषित केलं. 

दरम्यान, हाणामारी आणि मिलिंद कोसळल्याची घटना रिसॅार्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात 7 ते 8 महिला आणि 8 ते 10 अनोळखी पुरुषांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही. 

नेमकं घडलं काय? 

विरारच्या अर्नाळा येथील सेवन सी रिसॉर्टमधील कर्मचारी आणि रिक्षाचालकांच्या मारामारीत ठाण्याचे माजी परिवहन समिती सदस्य आणि शिवसेनेचे उपशहर प्रमुख मिलिंद मोरे याचं मारहाणीनंतर हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. हाणामारीची आणि हृदयविकाराचा झटका आल्याची संपूर्ण घटना रिसॉर्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याद कैद झाली आहे. 

रिसॉर्ट समोरील रिक्षा बाजूला करण्याच्या कारणावरून झालेल्या वादावादित चक्क ठाण्याच्या या फॅमिलिला 10 ते 15 जनांनी बेदम मारहाण केली आहे. यात महिलांना ही मारहाण करण्यात आली आहे. यात मिलिंदचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे, तर दोनजण यात गंभीर जखमी झाले आहेत. मृत मिलिंद मोरे ठाण्यात शिवसेनेच्या माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा आहे. 

विरारच्या अर्नाळा, नवापूर येथील सेवेन सी रिसॉटमध्ये काल रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास ही घटना घडली. रविवारची पिकनिक बनविण्यासाठी मयत मिलिंद मोरे आपल्या कुटुंबातील 15 ते 20 जणांसोबत विरारच्या अर्नाळा सेवन सी रिसॉर्टमध्ये पिकनिकसाठी आले होते. दिवसभर मज्जा, मस्ती करुन घरी परतत असताना रिसॉटच्या गेटमध्ये एका रिक्षाचा धक्का लागून त्यांची  भांडणं झाली होती. यात मिलिंदला आणि इतर दोघांनाही मारहाण झाली होती. यात बातचीत सुरु असताना मिलिंद अचानक चक्कर येवून कोसळला, त्याला तात्काळ नजीकच्या प्रकृती रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आलं होतं. मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं. 

जिल्हाप्रमुखाच्या मुलाचं निधन, मुख्यमंत्र्यांकडून दखल

विरारमध्ये ठाण्याचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांच्या मुलाचं निधन झालं आहे. जमावानं मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मारहाणीनंतर हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांची पोलीस उपायुक्तांशी फोनद्वारे चर्चा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळताच त्यांनी परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांना फोन करून संबधितावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याबाबत नवीन कायद्या भारतीय दंड संहिता 2023 ते कलम 105, 281, 74, 188(1) (2), 191(2), 118(2),  352, 351 (2) प्रमाणे  अर्नाळा पोलीस ठाण्यात 7 ते 8 महिला आणि 8 ते 10 अनोळखी पुरुष यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यात अद्याप कुणालाही  अटक करण्यात आली नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chandgad Vidhan Sabha : तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
Shrinivas Pawar : बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 19 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaVidhansabha Election 2024 :  मालिकांमधून छुप्या पद्धतीने प्रचाराचा शिंदे गटावर आरोपPune Flex :  ब्रीद वाक्यांचा वापर करत पुण्यात फ्लेक्सची उभारणीVipin Itankar Nagpur : मुंबई , पुणे , ठाणे, नागपुरातील मतदान केंद्र वेबतास्टिंगद्वारे जोडणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandgad Vidhan Sabha : तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
Shrinivas Pawar : बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
Raj Thackeray Vs Uddhav Thackeray: तुमच्या घरात सुनेला जाच होतो वाटतं; उद्धव ठाकरेंना खाष्ट सासू म्हणणाऱ्या राज ठाकरेंना किशोरी पेडणेकरांनी सुनावलं
अमितच्या बायकोशी शर्मिला ठाकरे खाष्ट सासूप्रमाणे वागतात का? किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंवर बोचरा वार
Vinod Tawde: विनोद तावडे 5 कोटी घेऊन आले, दोन डायऱ्याही सापडल्याचा आरोप; विरारमध्ये बविआ-भाजपचा राडा
विनोद तावडे 5 कोटी घेऊन आले, दोन डायऱ्याही सापडल्याचा आरोप; विरारमध्ये बविआ-भाजपचा राडा
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Embed widget