मुलुंडमध्ये साडेपाच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, शाळेतल्या शिपायाला अटक, गुन्हा दाखल
Mumbai Mulund Rape Case : मुलुंडमध्ये साडेपाच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला असून याप्रकरणी शाळेतल्या शिपायाला अटक करण्यात आली आहे.
Mumbai Mulund Rape Case : मुलुंड (Mulund) पूर्व येथील एका प्रसिद्ध शाळेत शाळेच्या शिपायानंच साडेपाच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार (Sexually Assault) केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळं सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणीही होत आहे.
मुलुंड पूर्व येथील एका प्रसिद्ध शाळेत ही धक्कादायक घटना घडली. शाळेच्या शिपायानं पटांगणात खेळण्यास आलेल्या साडेपाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले. हेमंत दामोदर वैती असं या 51 वर्षीय नराधमाचं नाव आहे. काल (सोमवारी) संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान चिमुकली शाळेच्या पटांगणात खेळण्यासाठी आली होती. ही चिमुकली शाळेच्या पटांगणाच्या बाजूलाच राहते. त्यावेळी ती एकटीच मैदानात खेळत होती. शिपायाची नजर मुलीवर पडली आणि आजूबाजूला कोणीच नाही याची खात्री करत त्यानं तिला हाक मारून स्वतःजवळ बोलावलं.
शिपायानं चिमुकलीला शाळेतील एका खोलीत नेतं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर पीडित चिमुकलीनं सर्व घटना घरी जाऊन आपल्या आईला सांगितली. तिच्या आईनं तात्काळ नवघर पोलीस ठाणं गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ याप्रकाराची दखल घेतली.
नवघर पोलिसांनी याबाबत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला ठाण्यातील त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. सदर आरोपी हा शाळेत गेली तीस वर्ष शिपाई म्हणून काम करत आहे. त्यानं या अगोदर देखील असे काही गुन्हे केलेत का? याची चौकशी आता पोलीस करीत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :