खळबळजनक! राज्यराणी एक्सप्रेसमध्ये इंजिनिअर तरुणीची छेडछाड; पोलिसांनी ठोकल्या बेड्या, महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
Crime News : सॉफ्टवेअर डेव्हलपर इंजिनिअर असलेल्या एका 22 वर्षीय तरुणीची राज्यराणी एक्सप्रेस मध्ये ठाणे-कल्याण दरम्यान छेडछाड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Crime News ठाणे: राज्यात सध्या घडत असलेल्या हत्या आणि गोळीबाराच्या घटनांनी कायदा अन् सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असताना महिला असुरक्षित असल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपर इंजिनिअर असलेल्या एका 22 वर्षीय तरुणीची राज्यराणी एक्सप्रेस मध्ये ठाणे-कल्याण दरम्यान छेडछाड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, इंजिनिअर असलेली तरुणी ठाण्यावरून कल्याणला येण्यासाठी राज्यराणी एक्सप्रेसमध्ये प्रवास करत असताना त्याच एक्सप्रेस मध्ये असलेला विकृत मोविया असरार शेख याने या तरुणीच्या शरीराला हात लावत छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातील संशयित आरोपी मोविया असरल शेख याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सध्या पोलीस याचा कसून तपास करत आहे. मात्र आता रेल्वेतही महिला सुरक्षित नाही का? असा प्रश्न या निमित्याने विचारला जाऊ लागला आहे.
धक्कादायक! रेल्वे पोलिसाचा गळा दाबून खून
राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून गेल्या काही महिन्यात खून, अत्याचार आणि बलात्काराच्या घटना वर्तमान पत्रांमध्ये दररोज वाचायला मिळत आहे. सध्या बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येवरुन राज्यभरात संतापाची लाट उसळली असतानाच, आता नवी मुंबईत चक्क एका रेल्वे (Railway) पोलीस हवालदाराचाही खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असणाऱ्या विजय चव्हाण यांची दोघा मारेकऱ्यांनी गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे गळा दाबून हत्या केल्यानंतर आरोपींनी त्या हवालदारास रबाळे ते घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलसमोर ढकलून दिल्याचेही आता पोलिस (Police) तपासात समोर आलं आहे. वाशी रेल्वे पोलिस ठाण्यात याप्रकरणी दोन मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.
हत्येनंतर रेल्वे ट्रॅकवर फेकला मृतेदह
मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणजे लोकल ट्रेनचा प्रवास. पहाटे 4 वाजल्यापासूनच मुंबईकरांच्या सेवेत ही लोकलसेवा सुरू होते. मात्र, आजच्या पहाटे रबाळे ते घणसोली रेल्वे मार्गावर मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तपासाअंती हा मृतदेह एका रेल्वे पोलीस हवालदाराचा असल्याचं उघडकीस आलं आहे. पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले मृत विजय चव्हाण हे घणसोली येथे राहण्यास होते. बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास दोघा व्यक्तींनी हेड कॉन्स्टेबल विजय चव्हाण यांना रबाळे ते घणसोली या रेल्वे स्थानकादरम्यान ठाण्याहून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या लोकलसमोर ढकलून दिले होते. याबाबतची माहिती मोटरमनने रेल्वे पोलिसांना दिल्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सदर घटनेतील मृत व्यक्ती हे पवनेल रेल्वे पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल विजय चव्हाण असल्याचे उघडकीस आले.
हे ही वाचा