एक्स्प्लोर

Dombivli : डोंबिवलीत महिलेवर सामूहिक अत्याचार, रिक्षात अत्याचार होत असताना नागरिकांची बघ्याची भूमिका

Dombivli Crime : रिक्षामध्ये बलात्कार होत असताना पीडित महिला मदतीसाठी याचना करत होती, मात्र नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतली हे धक्कादायक आहे. 

डोंबिवली : सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीतील कुंभार खान पाडा येथे एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार (Dombivli Gang Rape) झाल्याची घटना समोर आली आहे. मित्राच्या घरात बलात्कार झाल्यानंतर ती त्यांच्या तावडीतून घराबाहेर पडल्यानंतर दुसऱ्या मित्राने तिचा पाठलाग करत जबरदस्तीने रिक्षामध्ये कोंबून बलात्कार केल्याची घटना घडली. 

पीडित महिला आणि तिचा पती मित्राच्या घरी कपडे आणण्यासाठी गेले होते. तेव्हा मित्राने पीडित महिलेच्या पतीला दारू आणण्यासाठी पाठवले आणि महिलेवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांनी दोघांपैकी एक आरोपी दिनेश गडारी याला अटक केली आहे. तर दिनेशचा साथीदार सुनिल राठोड याचा शोध पोलीस घेत आहेत. 

पतीला दारू आणण्यासाठी पाठवले आणि...

डोंबिवली पूर्वेतील कुंभारखान परिसरात पिडीत महिला राहते. पीडित दाम्पत्य राहते घर सोडण्याच्या तयारी होते. या जोडप्याने आपले घरगुती सामान त्यांच्या ओळखीच्या असलेल्या दिनेश गडारी याच्या घरी ठेवले होते. 17 सप्टेंबरच्या संध्याकाळी पिडीत महिला आणि तिचा पती हे त्यांचे सामान आणण्यासाठी गेले होते. या दोघांच्या ओळखीचे दिनेश गडारी आणि सुनिल राठोड हे दोघे घरी होते. या दोघांनी पिडीत महिलेच्या पतीला दारु आणण्याकरता सांगितले. तिचा पती दारू आणण्यासाठी निघून गेला. तरुणी एकटीच घरी होती. याचा फायदा घेत दिनेश गडारी याने तरुणीवर बलात्कार केला. ती कशीबशी घराबाहेर निघाली आणि पळू लागली.

पाठलाग करून रिक्षात बलात्कार केला

तिचा पाठलाग करुन दिनेश गडारी याचा मित्र सुनील राठोड याने तिला एका रिक्षात कोंबले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिला मदतीची याचना करत होती. मात्र सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीतील नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतल. पीडित महिलेचा पती दारू घेऊन मित्राच्या घरी परतला तेव्हा तिने पतीला तिच्यावर झालेल्या बलात्काराची माहिती दिली.

आरोपींना कायद्याची भीती राहिली नाही. त्यांनी पतीसमोरच पीडितेवर अश्लील चाळे केले. पीडित महिलेच्या पतीला मारहाण करत त्याला देखील एका घरामध्ये डांबून ठेवण्यात आले. ही घटना झाल्याच्या नंतर आरोपींनी या दोघांना पोलीस स्टेशनला किंवा कुठे वाच्यता केली तर जीवे ठार  मारण्याची धमकी देत तिथून पिटाळून लावले. मात्र कसेबसे पीडित कुटुंब डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस स्टेशनला पोहोचले आणि या घटनेची हकीकत पोलिसांना सांगितली. 
 
दरम्यान, विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत दिनेश गडारी याला अटक केली आहे. तर त्याचा मित्र सुनिल राठोड अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाकुंभसाठी आलेल्या भाविकांची बोलेरोची बसला भीषण धडक; 10 जणांचा अंत, 19 जखमी, मृतदेह काढण्यासाठी अडीच तास लागले
महाकुंभसाठी आलेल्या भाविकांची बोलेरोची बसला भीषण धडक; 10 जणांचा अंत, 19 जखमी, मृतदेह काढण्यासाठी अडीच तास लागले
Sanjay Raut : वाल्मिक कराड, सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकच, देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडलाय; गुप्त भेट समोर येताच संजय राऊतांचा हल्लाबोल
वाल्मिक कराड, सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकच, देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडलाय; गुप्त भेट समोर येताच संजय राऊतांचा हल्लाबोल
आया बहिणींचा उद्धार करत, हातपाय तोडून टाकतो म्हणत कोल्हापुरात सत्ताधारी 'भाऊ'कडून खंडणी उकळल्याचा प्रकार, प्रदर्शन मंडपही अचानक कोसळला
आया बहिणींचा उद्धार करत, हातपाय तोडून टाकतो म्हणत कोल्हापुरात सत्ताधारी 'भाऊ'कडून खंडणी उकळल्याचा प्रकार, प्रदर्शन मंडपही अचानक कोसळला
Eknath Shinde : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु असतानाच एकनाथ शिंदेंचं मोठं सुतोवाच; म्हणाले, दादा भुसे...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु असतानाच एकनाथ शिंदेंचं मोठं सुतोवाच; म्हणाले, दादा भुसे...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 15 February 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सSuresh Dhas Meets Dhananjay Munde : सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात समेट कुणी घडवून आणला?Majha Gaon Majha Jilha at 730AM 15 February 2025 माझं गाव, माझा जिल्हाABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 15 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाकुंभसाठी आलेल्या भाविकांची बोलेरोची बसला भीषण धडक; 10 जणांचा अंत, 19 जखमी, मृतदेह काढण्यासाठी अडीच तास लागले
महाकुंभसाठी आलेल्या भाविकांची बोलेरोची बसला भीषण धडक; 10 जणांचा अंत, 19 जखमी, मृतदेह काढण्यासाठी अडीच तास लागले
Sanjay Raut : वाल्मिक कराड, सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकच, देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडलाय; गुप्त भेट समोर येताच संजय राऊतांचा हल्लाबोल
वाल्मिक कराड, सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकच, देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडलाय; गुप्त भेट समोर येताच संजय राऊतांचा हल्लाबोल
आया बहिणींचा उद्धार करत, हातपाय तोडून टाकतो म्हणत कोल्हापुरात सत्ताधारी 'भाऊ'कडून खंडणी उकळल्याचा प्रकार, प्रदर्शन मंडपही अचानक कोसळला
आया बहिणींचा उद्धार करत, हातपाय तोडून टाकतो म्हणत कोल्हापुरात सत्ताधारी 'भाऊ'कडून खंडणी उकळल्याचा प्रकार, प्रदर्शन मंडपही अचानक कोसळला
Eknath Shinde : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु असतानाच एकनाथ शिंदेंचं मोठं सुतोवाच; म्हणाले, दादा भुसे...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु असतानाच एकनाथ शिंदेंचं मोठं सुतोवाच; म्हणाले, दादा भुसे...
HSRP Number Plate : वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक, किंमत किती अन् कुठे मिळेल? जाणून घ्या A टू Z माहिती
वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक, किंमत किती अन् कुठे मिळेल? जाणून घ्या A टू Z माहिती
'या' राशींच्या लोकांच्या पदरात यश पडेल!
'या' राशींच्या लोकांच्या पदरात यश पडेल!
PAK vs NZ : काळी मांजर मैदानातून गेली अन्... चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तोंडघशी पडला पाकिस्तान! न्यूझीलंडने जिंकले विजेतेपद, पाहा Video
काळी मांजर मैदानातून गेली अन्... चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तोंडघशी पडला पाकिस्तान! न्यूझीलंडने जिंकले विजेतेपद, पाहा Video
Indias Got Latent Controversy: समय रैना-रणवीर अलाहाबादिया हाजिर हो... महाराष्ट्र सायबर सेलपाठोपाठ आसाम पोलिसांनीही धाडलं समन्स
समय रैना-रणवीर अलाहाबादिया हाजिर हो... महाराष्ट्र सायबर सेलपाठोपाठ आसाम पोलिसांनीही धाडलं समन्स
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.