एक्स्प्लोर

8 हजारांची लाच घेताना औषध निरीक्षकाला रंगेहात पकडलं,  पशुपक्षी फार्मचा परवाना देण्यासाठी मागितली होती लाच

लाचखोरी विरोधात धुळे एसीबीच्या (Dhule ACB)पथकाने आज कारवाई केली आहे. पशुपक्षी फार्मचे दुकान सुरु करण्यासाठी परवाना देण्यासाठी 8 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ही कारवाआ करण्यात आली आहे.

Dhule Crime News : लाचखोरी विरोधात धुळे एसीबीच्या (Dhule ACB)पथकाने आज कारवाई केली आहे. पशुपक्षी फार्मचे दुकान सुरु करण्यासाठी परवाना देण्यासाठी 8 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन कार्यालय, धुळे येथील औषध निरीक्षक किशोर देशमुख आणि दुसरा एक साथीदार तुषार जैन यांना पकडण्यात आले आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी कशी केली कारवाई? 

तक्रारदार यांनी शिरपूर येथील संकुलात भाडेतत्वावर गाळा घेतला असून त्यामध्ये त्यांना पशुपक्षी फार्माचे दुकान सुरू करायचे होते. यासाठी त्यांनी 25 फेब्रुवारी रोजी अन्न व औषध प्रशासन, धुळे विभागाकडे आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज केला होता. या अर्जासंदर्भात तक्रारदार व त्यांच्या आतेभावाने धुळे येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयात जाऊन औषध निरीक्षक किशोर देशमुख यांची भेट घेतली. तेव्हा देशमुख यांनी तक्रारदारांना शिरपूर येथील मेडिकल दुकानदार तुषार जैन यांच्यासह 4 मार्च रोजी त्यांच्या दुकानावर येऊन स्थळपरीक्षण करणार असल्याचे सांगितले. तसेच तक्रारदारांना तुषार जैन यांच्याकडे 8 हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा पुढील कार्यवाही करणार नाही, असे सांगितले. त्यामुळे तक्रारदारांनी त्याच दिवशी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडे तक्रार दिली. त्यानुसार एसीबीने 4 मार्च रोजी पडताळणी केली. त्यावेळी औषध निरीक्षक देशमुख यांनी खाजगी इसम तुषार जैन यांच्यासह शिरपूर येथे जाऊन तक्रारदारांच्या दुकानाचे स्थळपरीक्षण केले. त्यावेळी तुषार जैन यांनी तक्रारदारांकडे 8 हजार रुपये लाचेची मागणी केली आणि देशमुख यांनी त्यास दुजोरा दिला. त्यानंतर आज दिनांक 11 मार्च रोजी धुळे शहरातील पारोळा चौफुली येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदारांकडून तुषार जैन यांनी कारमधून येऊन 8 हजार रुपये स्वीकारले. यावेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर औषध निरीक्षक किशोर देशमुख यांनाही अन्न व औषध प्रशासन कार्यालय, धुळे येथून ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7-अ व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी लाच घेण्याचे प्रकार वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं याविरोधात लाचलुचपत प्रतिबंध विभाग सतर्क झालं आहे.

महत्वाच्या बातम्या:

धुळ्यात शिक्षिकेकडून 2 लाखांची लाच घेताना बड्या महिला अधिकाऱ्याला अटक; शिक्षण क्षेत्रात खळबळ, नेमकं प्रकरण काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई

व्हिडीओ

Sanjay Raut : भाजपसोबत न जाण्याचा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या, चंद्रपूरमधील घडामोडींवर टीका
Ritu Tawade Mumbai Mayor : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान
Ravindra Chavhan Nanded : भाजप प्रवेशाच्या अफवेवरून काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण संतापले..
Adnan Sami VS Congress And Sanjay Raut : संजय राऊतांचा वार, अदनानचा पलटवार Special Report
Govinda Politics : राजकारण पुरे झालं असं गोविंदा का म्हणाला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियानं TCS ला मागं टाकलं, सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत चौथं स्थान पटकावलं, डिसेंबर तिमाहीत 21 हजार कोटींचा नफा
SBI नं TCS ला मागं टाकलं, शेअर बाजारात चौथ्या स्थानी झेप, डिसेंबर तिमाहीत नफा वाढला
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अमेरिकेनं आमचा वापर केला, स्वार्थ संपताच टॉयलेट पेपरसारखे फेकलं, त्यांना साथ दिल्याची किंमत आजही मोजत आहोत; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेत कबुली
अमेरिकेनं आमचा वापर केला, स्वार्थ संपताच टॉयलेट पेपरसारखे फेकलं, त्यांना साथ दिल्याची किंमत आजही मोजत आहोत; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेत कबुली
Rahul Gandhi: तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
Embed widget