Devendra Fadnavis : मोठी बातमी! फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत, मुख्य आरोपीला 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
Devendra Fadnavis Death Threat : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
Maharashtra News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जीवे मारण्याची (Death Threat) धमकी देणाऱ्या मुख्य आरोपीला साताऱ्यातून (Satara) अटक करण्यात आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणारा मुख्य आरोपी किंचक नवले (Kinchak Navale) याला पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपी किंचक नवलेला 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीसांना सोशल मीडियावरुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल प्रक्षोभक भाषा वापरत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला साताऱ्यातून अटक करण्यात आली आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्हायरल व्हिडीओतील मुख्य आरोपी अटक करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणारी वक्तव्ये असलेल्या व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल करण्यात आला होता. या व्हायरल व्हिडीओ प्रकरणातील मुख्य आरोपी किंचक नवलेला साताऱ्यातून अटक करण्यात आली असून त्याची 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
मुख्य आरोपी किंचक नवलेला 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून मुख्य आरोपी किंचक नवलेचा शोध सुरू होता. तो वेशांतर करून वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याचं तपासात समोर आलं. अखेर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सांताक्रूझ पोलिसांनी त्याला शनिवारी सातारा येथील सदर बाझार येथून अटक केली आहे. हा व्हिडीओ आपल्या 'एक्स' हँडलम्हणजेच पूर्वीच ट्विटरवरून व्हायरल केल्याप्रकरणी योगेश सावंत याला याआधीच अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात आधीच अटक करण्यात आलेला योगेश हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष आहे. त्यालाही 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.