Delhi Crime : दिल्ली पुन्हा हादरली! एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकू हल्ला, नंतर स्वत:लाच संपवलं
Delhi Crime News : दिल्लीतील बेगमपूर येथे एका युवकाने एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूनं हल्ला केला. यानंतर फाशी घेत स्वत:ला संपवलं.
![Delhi Crime : दिल्ली पुन्हा हादरली! एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकू हल्ला, नंतर स्वत:लाच संपवलं delhi crime begumpur boy stabbed girl in unrequited love then committed suicide Delhi Crime : दिल्ली पुन्हा हादरली! एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकू हल्ला, नंतर स्वत:लाच संपवलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/01/31662ad5fe983968669c880d0ff4223b1685595836025584_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Delhi Boy Stabbed Girl : राजधानी दिल्लीतून पुन्हा एकदा हादरवणारी घटना समोर आली आहे. दिल्लीतील साक्षी हत्याकांडाची (Sakshi Murder Case) घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील बेगमपूर येथे एका सनकी तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीचा गळा कापला. यानंतर त्यानं स्वत: फाशी घेत आत्महत्या केली आहे.
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकू हल्ला, नंतर स्वत:ला संपवलं
पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीवर गंभीर चाकू हल्ला केला. यानंतर स्वत:ला संपवलं. घटनेची माहिती मिळताच गंभीर जखमी तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तरुणाला वाचवता आलेलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि तरुणी दोघेही एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये काम करत होते. एकतर्फी प्रेमात तरुणीचा नकार सहन न झाल्याने तरुणानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.
युवकानं तरुणीला प्रपोज केलं होतं
मिळालेल्या माहितीनुसार, या विक्षिप्त तरुणाने यापूर्वीही तरुणीला प्रपोज केले होतं, पण तरुणीने त्याला नकार दिला होता, असं सांगितलं जात आहे. या घटनेची माहिती मिळताच बेगमपूर पोलिसांनी गंभीर जखमी तरुणीला रुग्णालयात दाखल केलं. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत त्याचवेळी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
दोघेही एकाच कंपनीत कामाला होते
मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना बेगमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, आरोपीचं नाव अमित असल्याचं सांगितलं जात आहे. अमित आणि तरुणी हे दोघेही रोहिणी सेक्टर 24 मध्ये असलेल्या एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करत होते. ही कंपनी अमितच्या मोठ्या बहिणीची असल्याचं सांगितलं जात आहे. कंपनीत काम करत असतानाच अमितची तरुणीशी ओळख झाल्याचं बोललं जात आहे.
प्रकरणाचा पुढील तपास सुरु
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जून रोजी, शुक्रवारी दुपारच्या सुमारास युवकाने ऑफिसमध्येच तरुणीवर चाकू हल्ला केला. यानंतर ऑफिसमध्ये गोंधळ उडाला. गंभीर जखमी तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर मुलाने ऑफिसमधेच आत्महत्या केली. तरुणाचा मृत्यू झाला असून सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या तरुणाचे नाव अमित असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तरुणीवर उपचार सुरु आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Delhi Crime News : ''होय, मीच साक्षीला ठार मारलं'', 16 वर्षीय प्रेयसीला संपवणाऱ्या आरोपीची कबुली; दिल्लीतील धक्कादायक घटना
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)