Video Viral : डोकं चालवलं! विगमधून सोन्याची तस्करी, तब्बल 30 लाखांचा ऐवज जप्त
Delhi Airport : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई. विगमधून 30 लाख 55 हरांच्या सोन्याची तस्करी. कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

Delhi Airport : आपण अनेकदा तस्करी करण्यासाठी अनेक भन्नाट प्रयोगांचा किंवा युक्त्यांचा वापर तस्करांकडून होत असल्याचं पाहतो. पण दिल्लीत सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईतील तस्कराचा प्लान अगदीच वेगळा होता. त्यानं चक्क केसांच्या विगमध्ये सोनं लपवून तस्करी करण्याची योजना आखली होती. पण सीमाशुल्क विभागानं हा डाव उधळून लावला.
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं मोठी कारवाई केली आहे. विगमधून 30 लाख 55 हजारांच्या सोन्याची तस्करी करण्याचा डाव सीमाशुल्क विभागानं उधळून लावला आहे. कारवाईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. सोमवारी अबूधाबीहून दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांनी आरोपीला रोखलं आणि त्याच्या विगमधून 30 लाख 55 हजारांचं सोनं जप्त केलं.
प्रवासी आणि त्याच्या सामानाची कसून झडती घेतल्यानंतर, त्याच्या सामानात 686 ग्रॅम वजनाचे चिकट टेपने गुंडाळलेले तीन पाऊच सापडले. या प्रवाशानं आपल्या केसांच्या विगमध्ये (एक पाऊच) आणि गुदाशयात कॅप्सुलच्या आकाराच्या दोन पिशव्या लपवल्या होत्या. दिल्ली सीमाशुल्क विभागाकडून ही माहिती देण्यात आली. दरम्यान, या पाऊचमध्ये तब्बल 30 लाख 55 हजारांचं सोनं लपवण्यात आलं होतं. कसून चौकशीनंतर त्याच्याकडे सापडलेला ऐवज ताब्यात घेऊन भारतीय पासपोर्ट धारक प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.
यापूर्वीच्या कारवाईत 7.5 कोटींचं सोनं जप्त
दरम्यान, दिल्ली एअरपोर्टवर बऱ्याचदा अशा तस्करीची प्रकरणं समोर येतात. यापूर्वी काही आठवड्यांआधी सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन केनियन नागरिकांकडून साडेसात कोटी रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलं होतं. या प्रकरणातील आरोपींना नैरोबीहून आदिस अबाबा मार्गे आल्यानंतर पकडण्यात आलं आणि झडतीनंतर खास डिझाइन केलेल्या खिशात लपवून ठेवलेले 15.57 किलो वजनाचे 19 सोन्याचे बार जप्त करण्यात आले होते. जप्त करण्यात आलेल्या सोन्याच्या शुल्कात जवळपास 7.5 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलं होतं. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दुबई हे सोनं तस्करांचं तस्करीसाठीचं आवडतं ठिकाण आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
