एक्स्प्लोर

दादरमध्ये नंदीग्राम एक्स्प्रेसच्या शौचालयात मृत्यू; आता सर्वात मोठा ट्विस्ट, शिवसेनेच्या माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा दाखल

Mumbai Crime News: नंदिग्राम एक्सप्रेस ट्रेनमध्ये एक मृतदेह सापडल्यामुळे दादर रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली.

Mumbai Crime News मुंबई: नंदीग्राम एक्स्प्रेसच्या (Nandigram Express) शौचालयात 35 वर्षीय प्रवाशाचा मृतदेह सापडल्यानंतर दादर रेल्वे स्थानकावर (Dadar Nandigram Express Murder Case) तीन दिवसांनी दादर पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब साबळे असे मृतदेह सापडलेल्या व्यक्तीचे नाव असून तो घाटकोपर येथील रहिवासी होता. साबळे यांनी नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

सदर प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी मयत साबळे यांची पत्नी सुनीता हिची चौकशी केली. ज्यात तिने आरोप केला आहे की, साबळे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याने मानसिक तणावातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. तसेच एका महिलेला पाहून अश्लील चाळे केल्याचा साबळे यांच्यावर आरोप करण्यात आला होता. 

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 जुलै रोजी घाटकोपरमधील असल्फा गावात साबळे नाला साफ करत होते. यावेळी त्याची लुंगी सुटली, नेमकं त्याचवेळी महिलेचं लक्ष त्याकडे गेले. यावेळी महिलेला साबळे त्यांच्याकडे पाहून अश्लील चाळे करत असल्याचा समज झाला. महिलेने या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी बीएनएस कलम ७९ अन्वये साबळेंवर गुन्हा नोंदवला. एफआयआरची माहिती मिळताच साबळे अटक टाळण्यासाठी हिंगोली गावी गेले.

मृत साबळेंच्या पत्नीचे आरोप काय?

घाटकोपर पोलीस वारंवार पतीची चौकशी करत होते. शिवाय चौहान, तिचा पती व नातेवाईक वारंवार तिच्या घरी येऊन त्रास देत होते. अशात शिवसेनेचे माजी नगरसेविका किरण लांडगे यांनीही साबळे व त्यांच्या पत्नीला धमकावले असल्याचा आरोप साबळेंच्या पत्नीने  केला आहे. मुंबईत परत असताना पून्हा पोलिसांच्या त्रासाला सामोरे जावे लागेल, समाजातही त्याची चर्चा होऊन बदनामी होईल या भितीने नैराक्षेतून साबळे यांन नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात समोर आले. दरम्यान साबळेंच्या पत्नीच्या तक्रारीनुसार रसिला चौहान, तिचा पती महेंद्र चौहान, संतोष चौहान आणि अंतेश चौहान तसेच किरण लांडगे यांच्याविरुद्ध कलम १०८ (आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे), ३५१ (२) आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल केला सुरू केले आहे.

नेमकं प्रकरण काय?

नेहमीच गर्दीने गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकात 09 ऑगस्ट रोजी एक धक्कादायक घटना समोर आली होती. नंदिग्राम एक्सप्रेस ट्रेनमध्ये एक मृतदेह सापडल्यामुळे दादर रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली. नंदिग्राम एक्सप्रेसच्या शौचालयात साबळे गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले होते.  स्वतःला गळफास लावण्यासाठी त्याच्याकडील मफलरचा वापर केल्याचं समोर आलं होतं. मृत व्यक्ती मूळचा घाटकोपर परिसरातील रहिवासी होता. काही दिवसांपूर्वी त्याच्यावर छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि साबळे या प्रकरणात फरार होते.

संबंधित बातमी:

नंदीग्राम एक्सप्रेसच्या शौचालयात गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह; दादर रेल्वे स्टेशनवर पुन्हा खळबळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ambernath MIDC Gas Leakage: अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत वायूगळती, संपूर्ण शहरात धुराचं साम्राज्य
अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत वायूगळती, संपूर्ण शहरात धुराचं साम्राज्य
मान्सूनला परतीचे वेध! 'या' तारखेपासून परतीचा प्रवास होणार सुरु, अनंत चतुर्दशीला पाऊस विश्रांती घेणार
मान्सूनला परतीचे वेध! 'या' तारखेपासून परतीचा प्रवास होणार सुरु, अनंत चतुर्दशीला पाऊस विश्रांती घेणार
Mumbai News: नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
Bigg Boss Marathi Aarya Jadhao Slaps Nikki Tamboli :  निक्कीच्या कानाखाली जाळ काढला, नेटकऱ्यांनी घेतली आर्याची बाजू, ''बिग बॉसने  जर शिक्षा दिली तर...''
निक्कीच्या कानाखाली जाळ काढला, नेटकऱ्यांनी घेतली आर्याची बाजू, ''बिग बॉसने जर शिक्षा दिली तर...''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7.00 AM : 13 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLadki Bahin Yojana Scheme benefits : लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशांचा योग्य विनियोगSitaram Yechury Death : ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचं निधन, सीताराम येचुरींचा परिचयBhagyashri Aatram : धर्मरावबाबा आत्रामांची कन्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath MIDC Gas Leakage: अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत वायूगळती, संपूर्ण शहरात धुराचं साम्राज्य
अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत वायूगळती, संपूर्ण शहरात धुराचं साम्राज्य
मान्सूनला परतीचे वेध! 'या' तारखेपासून परतीचा प्रवास होणार सुरु, अनंत चतुर्दशीला पाऊस विश्रांती घेणार
मान्सूनला परतीचे वेध! 'या' तारखेपासून परतीचा प्रवास होणार सुरु, अनंत चतुर्दशीला पाऊस विश्रांती घेणार
Mumbai News: नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
Bigg Boss Marathi Aarya Jadhao Slaps Nikki Tamboli :  निक्कीच्या कानाखाली जाळ काढला, नेटकऱ्यांनी घेतली आर्याची बाजू, ''बिग बॉसने  जर शिक्षा दिली तर...''
निक्कीच्या कानाखाली जाळ काढला, नेटकऱ्यांनी घेतली आर्याची बाजू, ''बिग बॉसने जर शिक्षा दिली तर...''
बीसीसीआयकडून विराट कोहली इतकाच पगार चार खेळाडूंना मिळतो; एकाच वर्षांत करोडोंची कमाई
बीसीसीआयकडून विराट कोहली इतकाच पगार चार खेळाडूंना मिळतो; एकाच वर्षांत करोडोंची कमाई
मोठी बातमी! विदर्भात महायुतीला फटका बसणार? भाजपच्या अंतर्गत सर्वेत धक्कादायक माहिती, कोणत्या पक्षाला किती जागा?
मोठी बातमी! विदर्भात महायुतीला फटका बसणार? भाजपच्या अंतर्गत सर्वेत धक्कादायक माहिती, कोणत्या पक्षाला किती जागा?
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Embed widget