अनैतिक संबंधात ठरत होता अडथळा म्हणून आईनेच मुलाची हत्या केल्याचा आरोप
Crime News : अनैतिक संबंधात अडथळा नको म्हणून आईनेच आपल्या तीन वर्षाच्या मुलाची हत्या केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Crime News in Maharashtra : प्रियकराच्या मदतीने आईने आपल्या पोटच्या साडेतीन वर्षाच्या मुलाची हत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यात ही घटना घडली. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने मुलाची हत्या केली असल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे. मुलाची हत्या करून त्याच्या मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार केल्याची तक्रार मृत मुलाच्या वडिलांनी पोलिसांकडे केली आहे.
पोलिसांनी प्राची सुशांत वाजे आणि तिचा प्रियकर अमर पाटील यांच्याविरोधात गुन्हे दाखल केला आहे. मनन सुशांत वाजे (वय साडेतीन वर्ष) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. तक्रारदार सुशांतची पत्नी प्राची हिचे शिराळा तालुक्यातील बिळाशी येथील अमर पाटील याच्याशी अनैतिक संबंध होते. 27 जून 2021 रोजी प्राची वाजे ही मुलगा मननसह घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेली होती. ती अमर पाटील याच्या मुंबई येथील घरी वास्तव्यास गेली होती. यावेळी अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने प्राची आणि अमरसिंह यांनी मननचा शारीरिक छळ सुरू केला. त्यानंतर मनन यांची हत्या करून त्याची विल्हेवाट लावली असल्याचा आरोप सुशांत वाजे यांनी केला.
मननचा मुंबईत मृत्यू झाला असताना अमर पाटील आणि प्राची यांनी शिराळा तालुक्यातील बिळाशी ग्रामसेवकांकडे प्रतिज्ञापत्र करुन मनन याचा बिळाशी येथे मृत्यू झाल्याचे खोटी माहिती दिली. मनन याचा मुंबई येथे मृत्यू झाला असताना वाकुर्डे येथे त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करुन प्रेताची विल्हेवाट लावली होती असे सुशांत वाजेने आपल्या तक्रारीत म्हटले. सुशांत वाजे यांना काही दिवसांपूर्वी एक निनावी पत्र आले होते. या पत्रात मननच्या घातापताबद्दल दावा करणारा माहिती होती. त्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Beed Crime: गर्भवती पत्नीसह पतीची आत्महत्या, बीड येथील धक्कादायक घटना; पोलीस तपास सुरू
- लग्नाची स्वप्न दाखवून 26 महिलांना कोट्यवधींचा गंडा, पोलिसांकडून आरोपी गजाआड
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha