Crime News : नात्याला काळीमा फासणारी घटना, पोलीस असलेल्या बापानेच मुलीवर केला अत्याचार
Crime News : वडिलांच्या नेहमीच्या अत्याचाराला कंटाळून पिडीत मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली.
Crime News : आपल्या देशात वडील (Father) आणि मुलीचं नातं सर्वात पवित्र मानले जाते. घरात मुलगी आल्यास लक्ष्मी येते असेही म्हटले जाते. आपल्या मुलीसाठी वडील अनेक कष्ट करतात. पण कधी कधी काही नराधम हे पवित्र नातं बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. आपली वासना भागवण्यासाठी स्वतःच्याच मुलीवर बलात्कार (Rape) करण्यासारखे घाणरडे कृत्य केल्याच्या घटना त्यामुळे समोर येतात. आता अशीच काही मनाला चटका लावणारी घटना समोर आली असून, एका पोलिसाने (Police) चक्क आपल्याच पोटच्या लेकीवर बलात्कार केला आहे. तर, वडिलांच्या नेहमीच्या या अत्याचाराला कंटाळून पिडीत मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली. त्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, "कोलकात्याच्या दक्षिणेकडील बेहाला येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून, तो स्वतः पोलीस सेवेत कार्यरत आहेत. त्याच्यावर आपल्या स्वतःच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, ज्या पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याच पोलीस ठाण्यात तो हवालदार पदावर कार्यरत आहे. आरोपीच्या 13 वर्षीय मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेत दिलेल्या फिर्यादीनुसार वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एके दिवशी संधी पाहून पोटच्या मुलीवर बलात्कार केला
पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ऑक्टोबरमध्ये तिची आई वडिलांसोबत भांडण करून घर सोडून निघून गेली होती. काही दिवसांमध्ये दोघांचा घटस्फोट झाला. मात्र यावेळी आईने तिच्या दोनही मुलींचा ताबा वडिलांकडे दिला. दरम्यान, पिडीत मुलगी सात वर्षांच्या लहान बहिणीसोबत वडिलांच्या घरीच राहू लागली. पण काही दिवसांनी तिच्या वडिलांनीच तिचा विनयभंग केला. ड्युटीवरून परतल्यानंतर तो अनेकदा तिच्यावर जबरदस्ती करत असे. एके दिवशी संधी पाहून त्याने पोटच्या मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर पुढे सतत हा प्रकार सुरुच होता.
रोजच्या अत्याचाराला कंटाळून पीडितेने स्वतः पोलीस ठाणे गाठले
सुमारे दोन महिन्यांपासून नराधम बापाकडून मुलीवर अत्याचार सुरूच होता. एका दिवशी रोजच्या अत्याचाराला कंटाळून पीडितेने स्वतः पोलीस ठाणे गाठले. तेथे वरिष्ठ अधिकार्यांसमोर वडिलांच्या काळ्या कृत्याची कहाणी सुनावली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना देखील धक्का बसला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नराधम बापाच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (लैंगिक अत्याचार) आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी पोलिस कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
छत्रपती संभाजीनगरात पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; नराधम आरोपी एका मुलाचा बाप