एक्स्प्लोर

छत्रपती संभाजीनगरात पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; नराधम आरोपी एका मुलाचा बाप

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : पिडीत मुलीला तुला पेरू देतो, असे म्हणून आरोपीने घरात नेले व दरवाजा बंद करून त्याने सदर मुलीवर अत्याचार केला.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या सहा वर्षीय मुलीवर अत्याचार (Rape) केल्या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात (Paithan Police Station) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. पैठण तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. सदर घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पैठण पोलीस त्याचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच भागात अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी अत्याचार केल्याची घटना ताजी असताना ही घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बाळू ज्ञानोबा जाधव असे या नराधमाचे नाव आहे. 

अधिक माहितीनुसार, पहिलीच्या वर्गात शिकत असलेली अल्पवयीन मुलगी दुपारी शाळेतून घरी जात होती. यावेळी रस्त्यात या मुलीला अडवून बाळू ज्ञानोबा जाधव याने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यामुळे, पीडित मुलीच्या आईने पैठण पोलीस ठाणे गाठून या अत्याचार प्रकरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळास भेट देऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पोलिसांचा पथक त्याचा शोध घेत आहे. 

यापूर्वी दोन वेळा त्याने मुलीची छेड काढली

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा विवाहित असून, त्याला एक मुलगा आहे. आरोपी हा पिडीत मुलीच्या घराजवळ राहत असून, गावात यापूर्वी दोन वेळा त्याने मुलीची छेड काढली होती अशीही चर्चा आहे. मात्र, गावातील प्रकरण असल्याने ग्रामस्थांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटवले होते. परंतु, आता त्याने एका मुलीवर अत्याचार केल्याने गावात खळबळ उडाली आहे. तर, पोलिसांत गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला आहे.

पेरू देतो म्हणून घरात घेऊन गेला...

पिडीत मुलगी मंगळवारी दुपारी शाळेतून घरी जेवण्यासाठी आपल्या चुलतभावाबरोबर चालली होती. यावेळी आरोपी बाळू जाधव याने सदर मुलीला तुला पेरू देतो, असे म्हणून त्याच्या घरात नेले व दरवाजा बंद करून त्याने सदर मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर तो फरार झाला. घाबरलेल्या पीडित मुलीने दोन दिवसांनंतर ही बाब आपल्या आई, वडिलांना सांगितली. त्यानंतर आरोपी बाळू ज्ञानोबा जाधव विरोधात बलात्कार व बाललैंगिक अत्याचार याकलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैठण पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आले असून, त्याचा शोध घेतला जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Washim Crime News : भावाबहिणीच्या नात्याला काळीमा! अल्पवयीन बहिण 8 महिन्यांची गरोदर, नंतर कळलं आतेभाऊच कारणीभूत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरेAjit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
Embed widget