एक्स्प्लोर

Amaravati Crime : आधी एक्स गर्लफ्रेण्डच्या आई आणि भावाला जाळून मारलं, मग तरुणाने स्वतःही पेटवून घेत आत्महत्या केली

Amaravati Crime : एक्स गर्लफ्रेण्डची आई आणि भावाला जिवंत जाळून तरुणाने स्वत:ही पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे.

अमरावती (Amaravati) : एक्स गर्लफ्रेण्डची आई आणि भावाला जिवंत जाळून तरुणाने स्वत:ही पेटवून घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे. वरुड तालुक्यातील वंजडी इथे रविवारी रात्री हा प्रकार घडला. लता सुरेशराव भोंडे आणि प्रणय सुरेशराव भोंडे अशी जाळून हत्या (Murder) केलेल्या आई आणि मुलाचं नाव आहे. तर आशिष ठाकरे असं मृत आरोपीचं नाव आहे.

आई आणि मुलाला जाळून मारण्याचं कारण काय?

आशिष ठाकरे या तरुणाचे मुलीसोबत प्रेमसंबंध होते. काही वर्षे ते सोबत होते आणि एकत्र राहत होते. परंतु त्यांच्यातील प्रेमसंबंध मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. त्यामुळे दोघेही दुसरीकडे एकत्र राहू लागले. मात्र त्यानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले. वाद वाढत गेला आणि त्यांच्यातील नातं तुटलं. काही महिन्यांपूर्वी ते दोघे वेगळे झाले. प्रियकराशी भांडण झाल्यानंतर प्रेयसी (Girlfriend) आपल्या घरी आई आणि भावासोबत राहत होती. प्रेयसीला आपल्यासोबत पुन्हा घेऊन जाण्यासाठी प्रियकर सतत तिच्या घरी जात होता. तरुणीची आई आणि भाऊ पुन्हा तरुणीला तरुणासोबत पाठवण्यास तयार नव्हते. यामध्ये तरुणीची आई आणि भाऊ यांच्यासोबत त्याचं भांडणही झालं होतं. 

भांडणाचा राग मनात ठेवला आणि...

याच वादातून हे हत्याकांड घडल्याची माहिती आहे. याच भांडणाचा राग मनात ठेऊन या तरुणाने बदला घेण्याचा निर्णय घेतला. प्रेयसी घरी नसताना हा तरुण तिच्या घरी गेला. त्यानंतर आशिष ठाकरेने वरुड तालुक्यातील वंडली इथे रात्री एक वाजताच्या दरम्यान एक्स गर्लफ्रेण्डची आई आणि भावाची जाळून हत्या केली. त्यानंतर आपण केलेल्या कृत्यामुळे भयभीत होऊन आरोपी तरुणाने सुद्धा स्वत: जाळून घेऊन आत्महत्या केली. यामध्ये लता सुरेशराव भोंडे (वय 45 वर्ष) आणि मुलगा प्रणय सुरेशराव भोंडे (वय 20 वर्ष) यांची जाळून हत्या करण्यात आली. तर आरोपी आशिष ठाकरे (वय 25 वर्ष) याने स्वतः जाळून घेतलं. यात तो गंभीर भाजला गेल्याने त्याचा देखील मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत. परंतु या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा

Parbhani : पतीला भीती दाखवण्यासाठी गेली अन् खरोखरच गळफास बसल्याने जीव गमावून बसली; पाहा नेमकं काय घडलं?

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Amravati Crime News: कोण जास्त मुली पटवणार? अयान-उझरमध्ये पैज, पैशावरून वाद झाला; रागामुळं मित्राचे 18 आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड केले, अमरावती प्रकरणाचं बिंग फुटलं
कोण जास्त मुली पटवणार? अयान-उझरमध्ये पैज, पैशावरून वाद झाला; रागामुळं मित्राचे 18 आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड केले, अमरावती प्रकरणाचं बिंग फुटलं
Nashik Crime News: नाशिकच्या राजकारणात 'गुन्ह्यांची हॅटट्रिक'; एकाच दिवशी तीन बड्या नेत्यांवर गुन्हे, शहरात मोठी खळबळ
नाशिकच्या राजकारणात 'गुन्ह्यांची हॅटट्रिक'; एकाच दिवशी तीन बड्या नेत्यांवर गुन्हे, शहरात मोठी खळबळ
Amravati Crime: 'बॉस' लिहलेला टी-शर्ट, भर रस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन, चक्क वर्दीतल्या पोलिसांनीच आरोपी अयानला केक भरवला; परतवाडा व्हिडीओ व्हायरल प्रकरणाला नवं वळण
'बॉस' लिहलेला टी-शर्ट, भर रस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन, चक्क वर्दीतल्या पोलिसांनीच आरोपी अयानला केक भरवला; अमरावतीच्या परतवाडा व्हिडीओ व्हायरल प्रकरणाला नवं वळण
Nashik Crime News: नाशिकमधील धर्मांतर प्रकरणात परदेशातून फंडिंग? आता थेट NIA करणार तपास, राष्ट्रीय महिला आयोगाची टीमही नाशिकमध्ये येणार
नाशिकमधील धर्मांतर प्रकरणात परदेशातून फंडिंग? आता थेट NIA करणार तपास, राष्ट्रीय महिला आयोगाची टीमही नाशिकमध्ये येणार

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : आसिम मुनीर तेहरानमध्ये दाखल, तिकडे डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानवर प्रेमाचा वर्षाव; शांतता कराराबाबत केली मोठी घोषणा, म्हणाले, इराणसोबत लवकरच...
आसिम मुनीर तेहरानमध्ये दाखल, तिकडे डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानवर प्रेमाचा वर्षाव; शांतता कराराबाबत केली मोठी घोषणा, म्हणाले, इराणसोबत लवकरच...
Hardik Pandya: 'जबाबदारी घ्यावीच लागेल', पंजाबने धुळ चारताच हार्दिक पांड्या कुणावर भडकला? तिकडं सेहवागनं सुद्धा भळभळत्या जखमेवर मीठ चोळलं!
Video: 'जबाबदारी घ्यावीच लागेल', पंजाबने धुळ चारताच हार्दिक पांड्या कुणावर भडकला? तिकडं सेहवागनं सुद्धा भळभळत्या जखमेवर मीठ चोळलं!
Nashik Crime News: नाशिकच्या राजकारणात 'गुन्ह्यांची हॅटट्रिक'; एकाच दिवशी तीन बड्या नेत्यांवर गुन्हे, शहरात मोठी खळबळ
नाशिकच्या राजकारणात 'गुन्ह्यांची हॅटट्रिक'; एकाच दिवशी तीन बड्या नेत्यांवर गुन्हे, शहरात मोठी खळबळ
Amravati Crime: 'बॉस' लिहलेला टी-शर्ट, भर रस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन, चक्क वर्दीतल्या पोलिसांनीच आरोपी अयानला केक भरवला; परतवाडा व्हिडीओ व्हायरल प्रकरणाला नवं वळण
'बॉस' लिहलेला टी-शर्ट, भर रस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन, चक्क वर्दीतल्या पोलिसांनीच आरोपी अयानला केक भरवला; अमरावतीच्या परतवाडा व्हिडीओ व्हायरल प्रकरणाला नवं वळण
Nashik Crime News: नाशिकमधील धर्मांतर प्रकरणात परदेशातून फंडिंग? आता थेट NIA करणार तपास, राष्ट्रीय महिला आयोगाची टीमही नाशिकमध्ये येणार
नाशिकमधील धर्मांतर प्रकरणात परदेशातून फंडिंग? आता थेट NIA करणार तपास, राष्ट्रीय महिला आयोगाची टीमही नाशिकमध्ये येणार
Dilip Kumar Nephew Ayub Khan Flop In Bollywood: सुपरस्टार दिलीप कुमार यांचा पुतण्या, पण बॉलिवूडमध्ये नाही चालला 'या' अभिनेत्याचा पत्ता; 32 फिल्म 30 शो करुनही ठरला 'सुपरफ्लॉप'
सुपरस्टार दिलीप कुमार यांचा पुतण्या, पण बॉलिवूडमध्ये नाही चालला 'या' अभिनेत्याचा पत्ता; 32 फिल्म 30 शो करुनही ठरला 'सुपरफ्लॉप'
Sangli Crime News: किरकोळ वादनं संतापाचं टोक गाठलं; पोटच्या लेकाने आईला संपवलं, सांगली जिल्ह्यातील मानमोडी गाव हादरलं
किरकोळ वादनं संतापाचं टोक गाठलं; पोटच्या लेकाने आईला संपवलं, सांगली जिल्ह्यातील मानमोडी गाव हादरलं
Hardik Pandya Jasprit Bumrah MI vs PBKS IPL 2026: तुझ्यानुसार नव्हे माझ्यानुसार...हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्यात वाद; नेमकं काय घडलं?
तुझ्यानुसार नव्हे माझ्यानुसार...हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्यात वाद; नेमकं काय घडलं?
Embed widget