Crime News: आठवीतील विद्यार्थ्याकडून दहावीतील विद्यार्थ्याचा खून; शाळेत जेवणाच्या सुट्टीमध्ये घडला प्रकार, अहिल्यानगरमध्ये खळबळ
Crime News: अहिल्यानगरमध्ये शाळकरी विद्यार्थ्याने त्याच्यात शाळेतील विद्यार्थ्याचा खून केल्याचं समोर आलं आहे. शहरातील मध्यवर्ती असलेल्या एका विद्यालयातील ही घटना आहे.

Crime News: राज्यातील अहिल्यानगरमधील (Ahilyanagar Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अहिल्यानगरमध्ये शाळकरी विद्यार्थ्याने त्याच्यात शाळेतील विद्यार्थ्याचा खून केल्याचं समोर आलं आहे. आठवीतील विद्यार्थ्याकडून दहावीतील विद्यार्थ्याचा खून झाला आहे. या घटनेमुळे अहिल्यानगर शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील मध्यवर्ती असलेल्या एका विद्यालयातील ही घटना आहे.
आठवीतील विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून केला आहे. दोन्ही विद्यार्थी एकाच भागात राहणारे आहेत. क्रिकेट खेळाच्या करणावरून दोघांमध्ये भांडण झालं होतं. शाळेत जेवणाच्या सुट्टीमध्ये दोघांमध्ये पुन्हा भांडण सुरू झालं. यात आठवीतील विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दहावीतील विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे.
आठवीतील विद्यार्थ्याला घेतलं ताब्यात-
सदर घटनेतील मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे. दरम्यान पोलीस तात्काळ सदर विद्यालयात पोहोचले त्यांनी घटनेची माहिती घेतली आणि हल्ला करणाऱ्या आठवीतील विद्यार्थ्याला देखील ताब्यात घेतल आहे.
जेलमधून निघताच काढली मिरवणूक, गुन्हा दाखल-
जामिनावर सुटल्यानंतर मोटारीतून मिरवणूक काढून भाईगिरी केल्याप्रकरणी सागर भिंगारदिवेसह त्याच्या 80 समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार या प्रकाराचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता... बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणात आरोपी असलेल्या सागर भिंगारदिवे कोठडीत होता. न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केल्यानंतर अहिल्यानगरच्या सबजेलमधून त्याला सोडण्यात आले. त्यावेळी कारागृहाबाहेर मोठा जमाव जमला होता...त्याच्या समर्थकांनी तो जेलमधून आल्यावर पोलिसांसमोरच खांद्यावर घेऊन त्याची मिरवणूक काढली होती...या प्रकरणी अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
संबंधित बातमी:
Aarey News : आरेच्या जंगलात आजीला फेकणाऱ्या नातवाला अटक, त्वचेचा कॅन्सर असल्याने केलं होतं कृत्य























