एक्स्प्लोर

Aarey News : आरेच्या जंगलात आजीला फेकणाऱ्या नातवाला अटक, त्वचेचा कॅन्सर असल्याने केलं होतं कृत्य

Mumbai Crime : आरेच्या रस्त्यावरील 50 हून अधिक सीसीटीव्हीचा शोध घेत पोलिसांनी नातवाला अटक केली आहे. त्वचेचा कॅन्सर असलेल्या आजीवर सध्या उपचार सुरू आहेत. 

मुंबई : त्वचेचा कॅन्सर असलेल्या स्वतःच्या आजीला आरेच्या जंगलात फेकून जाणाऱ्या नातवाला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून गुंगारा देणाऱ्या नातवावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली आहे. 22 जून रोजी पहाजे 3.30 वाजता माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडली होती. यशोदा गायकवाड असे या वृद्ध महिलेचे नाव असून तिच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर नातवावर करण्यात आलेले सर्व आरोप त्याने फेटाळले आहेत.

आजीला नातवाने कचऱ्याच्या डब्यात फेकले

त्वचेचा कॅन्सर असलेल्या स्वतःच्याच आजीला नातवाने आरे मधल्या जंगलात असलेल्या कचऱ्यात फेकल्याची घटना समोर आली होती. रविवारी रात्री 3:30 वाजता 70 वर्षीय वयोवृद्ध आजीला नातवाने त्याच्या आजीला आरेच्या जंगलात फेकले होते.

पोलिसांना याची माहिती मिळताच त्या महिलेला ट्रामा केअर रुग्णालयात दाखल केले होते.  मात्र तिथे उपचार नसल्यामुळे आरे पोलिसांनी आजीला कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

50 हून अधिक सीसीटीव्हीच्या आधारे तपास

या घटनेनंतर तीन दिवसांपासून पोलिस त्या नातवाचा शोध घेत होते. आजीला बोलता येत नसल्यानं, तिच्यावर ही वेळ कुणामुळे आली हे कळणं देखील कठीण झालं होतं. आरे पोलिसांनी रस्त्यावर असलेल्या 50 पेक्षा अधिक सीसीटीव्हीची तपासणी करून या प्रकरणी गुन्हा नोंद केला. आता हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या नातवाला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासोबत रिक्षा चालक आणि एका सहकाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे.

आरे पोलिसांनी BNS कलम CR no 100/25 U/S 125 BNS , 3(5), R/W Section 24  senior citizen act 2007 चा अंतर्गत नातवाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वृद्धेवर उपचार करण्यासाठी नागपूरचे कॅन्सर हॉस्पिटल तयार

मुंबईच्या गोरेगावमधल्या आरे कॉलनीत बेवारस स्थितीत सापडलेल्या वृद्ध महिलेवर उपचार करण्याची तयारी नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटनं दाखवली आहे. एबीपी माझानं वृद्ध महिलेची बातमी दाखवली होती आणि त्याचाच इम्पॅक्ट म्हणजे त्या आजीच्या मदतीसाठी सरसावलेले हात. 

नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे प्रमुख शैलेश जोगळेकर यांनी एबीपी माझाच्या बातमीची दखल घेतली आहे. वृद्ध महिला यशोदा गायकवाड यांच्यावर योग्य उपचार करुन त्यांना कॅन्सरमुक्त करण्याचा प्रयत्न करु असा विश्वासही शैलेश जोगळेकर यांनी व्यक्त केला.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
Embed widget