Crime News : 'माता न तू वैरिणी'; 13 महिन्याच्या चिमुकलीची हत्या करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न
Crime News : कौटुंबिक वादाच्या रागातून एका महिलेने आपल्या 13 महिन्याचा मुलीची हत्या केली. त्यानंतर या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला.
Crime News : अकोल्यात 'माता न तू वैरिणी' या म्हणीचा प्रत्यय आणणारी खळबळजनक घटना घडली आहे. अकोला जिल्ह्यातील बाभूळगावात १३ महिन्याच्या मुलीची हत्या करून आईने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. प्रियंका उमेश बोबडे असं या आरोपी मातेचं नाव आहे. तर अधिरा बोबडे असं मृतक चिमुकलीचं नाव आहे. कौटुंबिक कलहातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे. काल संध्याकाळी ही घटना घडलीय. यात हाताची नस कापून गंभीर जखमी असलेल्या प्रियंकावर अकोला जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. महिलेचा पती उमेश बोबडे हा पोलीस शिपाई आहे. पतीच्या तक्रारीवरून महिलेवर एमआयडीसी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे घटना?
कौटुंबिक कलहानं एक सुंदर कुटुंब अक्षरश: विस्कटून गेलं. ही घटना आहे अकोला जिल्ह्यातील बाभूळगावची. एका आईनंच आपल्या 13 महिन्याच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रियंका बोबडे असं या आईचं नाव आहै. तर मुलीचं अधिरा बोबडे असं नाव आहे. अकोला शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील बाबुळगाव येथे काल संध्याकाळी हा प्रकार उघडकीस आला. आपल्या 13 महिन्याच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर प्रियंकाने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. घरातील इतर व्यक्तींच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी प्रियंकाला अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी भरती केले आहे. या महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल
दरम्यान या हत्येमागील तसेच आत्महत्या करण्याच्या प्रयत्नाबाबत नेमकं कारण कळू शकलं नाही. याप्रकरणी महिलेचा पती उमेश बोबडे याच्या तक्रारीवरून महिलेविरूद्ध एमआयडीसी पोलिसांत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेचा पती उमेश हा पोलीस शिपाई आहे. मागील काही दिवसांपासून पती-पत्नीत कौटुंबिक वाद असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: