Buldhana Crime : बुलढाण्याच्या शेतातून तब्बल 12 कोटी 61 लाखांची अफू जप्त; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा गृह खात्यावर निशाणा, म्हणाले....
Buldhana Crime News : बुलढाण्यात चक्क अफूची शेतीमधून तब्बल 12 कोटी 61 लाखांची अफूची झाडे जप्त करण्यात आली. या प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाष्य करत गृह खात्यावर निशाणा साधलाय.

Buldhana Crime News : बुलढाणा जिल्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने काल (22 फेब्रुवारी) जवळपास 12 कोटी 60 लाख रुपयाची गांजाची झाडे एका शेतातून जप्त केलीत. या प्रकरणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) म्हणाले की, एकटा शेतकरी अशी शेती करू शकत नाही. यामागे राजकीय नेता व राजकीय पाठबळ असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी याची कसून चौकशी करावी. यामागे कोण आहे? हे समोर आणावं. ज्यावेळी बुलढाण्यात (Buldhana Crime News) अफूची शेती होत होती त्यावेळेस बुलढाण्यासह राज्यातील पोलीस हे हप्ता वसूलीत मशगूल होते, असा हल्लाबोल ही त्यांनी केला आहे.
सरकार लाडक्या सत्तेत मशगूल- हर्षवर्धन सपकाळ
शेतकऱ्यांना आता शेती परवडणे कालबाह्य झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी आता मादक पदार्थांच्या शेतीकडे वळला आहे. ही धोक्याची घंटा असून सरकारने लवकर सावध व्हावे. अलीकडचं सरकार हेच संविधानाला गुंडाळून काम करतंय. या देशाचा मालक जनता आहे, सरकारने हे विसरू नये. सध्या राज्यात मोठी महसुली तूट निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे राज्य सरकार अनेक योजना बंद करत आहेत. सरकार लाडक्या सत्तेत मशगूल असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
छावा चित्रपटावरील सर्व कर केंद्र आणि राज्याने काढून घ्यावा- हर्षवर्धन सपकाळ
कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद आणि भाषावाद हा जुना मुद्दा आहे. यात महाराष्ट्र एकीकरण समितीची आणि काँग्रेसची भूमिका एकच आहे. सुरेश धस हे कधी कुणाला भेटतात, कधी कुणाला भेटतात त्यामुळे ते काय दावे करतात याला आता कुठलेही महत्त्व राहिलेल नाही. संपूर्ण महाराष्ट्र सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करत असल्याचे ही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. छावा चित्रपटावरील सर्व कर केंद्राने आणि राज्याने काढून घ्यावे, अशी मागणी मी शिवजयंतीच्या दिवशी केली. मात्र अद्याप सरकारकडून त्यावर कुठल्याही हालचाली नाहीत. असेही ते म्हणाले.
दंगली घडवणे हा या सरकारचा कट- हर्षवर्धन सपकाळ
धार्मिक स्थळांच्या बाबतीत सरकारने योग्य कायदा आणि सुव्यवस्था सांभाळून ती हाताळली पाहिजे. मात्र दंगली घडवणे हा या सरकारचा कट आहे. रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी भगवा घालून स्टेटस ठेवलं. भगवा हे महाराष्ट्र धर्माचे निशाण आहे. येत्या आठवड्यात ते मला मुंबईला मुक्कामी येऊन भेटणार आहेत. त्यांच्या पक्षांतराबाबत अफवा आहेत.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

