Chhatrapati Sambhajinagar: सोबत शिक्षण, 20 वर्षांपासून व्यवसायात साथ, पण मित्रानेच मित्राचा घात केला; उद्योजक लड्डांच्या घराची टीप देणार जवळचाच निघाला
Chhatrapati Sambhajinagar: उद्योजक संतोष लड्डा (Santosh Ladda) यांच्या निवासस्थानी असलेल्या सोन्याची आणि पैशाची टीप देणारा व्यक्ती दूसरा तिसरा कुणी नाही तर संतोष लड्डा यांचा जवळचा मित्र निघाला आहे.

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठ्या दरोडा प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. वाळूजमधील उद्योजक संतोष लड्डा (Santosh Ladda) यांच्या निवासस्थानी असलेल्या सोन्याची आणि पैशाची टीप देणारा व्यक्ती दूसरा तिसरा कुणी नाही तर संतोष लड्डा यांचा जवळचा मित्र निघाला आहे. या व्यक्तीने संतोष लड्डासोबतच शिक्षण घेतलं असून ते लड्ड्यांच्या अत्यंत विश्वासू समजल्या जाणाऱ्या बालासाहेब चंद्रकांत इंगोले यांनीच दरोडासंदर्भात पहिली टीप दिली असल्याचे समोर आले आहे. डिसेंबर महिन्यात संतोष लड्डा किरकोळ कारणावरून रागावल्यानं बालासाहेब रागावले होते. त्याच रागातून पुढे जाऊन त्यांनी ही माहिती पुरवल्याचे आता बोलले जाऊ लागलंय. दरम्यान या प्रकरणाचा सखोल तपास सध्या पोलीस करत असून या प्रकरणात आणखी काय नवी माहिती पुढे येते हे पाहणे महत्वाच ठरणार आहे.
लड्डांनी बालासाहेब इंगोलेला नेमका कशावरुन रागावलं?
काही महिन्यांपूर्वी लड्डा यांच्या वडिलांचे निधन झालं. त्यावेळी जवळचा असलेला बालासाहेब इंगोले गावी भेटायला गेला. कंपनीत काहीही न सांगता तो गेला आणि कंपनीत गैरहजर असल्याने त्यावर कंपनीतून त्याला कॉल केले गेले. त्याने ते कॉल उचलले नाहीत. नंतर ज्यांनी कॉल केले त्यांना शिवीगाळ केली. दरम्यान, सव्वा महिन्यानंतर लड्ड्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी कॉल करणारे हे वयस्कर व्यक्ती आहेत त्यांच्याशी असं वागणं बरं नाही, त्यांची माफी मागायला सांगितली आणि हा राग त्याच्या मनात होता.
कोण आहेत बालासाहेब इंगोले?
बालासाहेब चंद्रकांत इंगोले कंपनीमध्ये कटिंग इंचार्ज असून जवळचा मित्र आहे. त्यांनी सोबत शिक्षण घेतलं होतं. 20 वर्षांपासून त्यांच्या कंपनीत काम करत होता. त्याच्या घरी भाजीपाला घेवून जात होता. त्याला घरातल्या पैसे आणि सोन्याची माहिती होती. त्यावरून त्याने पहिली टीप दिली.
दरोड्याप्रकरणी आणखी चार जणांना अटक
1. बालासाहेब चंद्रकांत इंगोले , वय 46 वर्ष, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. सूर्यवंशी नगर सिडको वाळूज महानगर एक ता. जिल्हा छत्रपती संभाजी नगर
2. आजिनाथ पुंजाराम जाधव, वय 22 वर्ष, व्यवसाय किराणा दुकान रा. सिडको वाळूज महानगर एक ता. जिल्हा छत्रपती संभाजी नगर
3. गणेश गंगाधर गोराडे, वय 22 वर्ष, व्यवसाय खा नोकरी, रा. सिडको वाळूज महानगर एक जिजामाता नगर, ता. जिल्हा छत्रपती संभाजीनगर
4 महेश दादाराव गोराडे, वय 26 वर्ष, व्यवसाय मेडिकल चालक, रा. वडगाव कोल्हाटी ता. जिल्हा छत्रपती संभाजी नगर
इतर महत्वाच्या बातम्या
























