Chhatrapati Sambhajinagar Crime : पोलीस पत्नीची तिसऱ्या मजल्यावरुन उडी, पतीसह सासरच्यांवर छळाचा आरोप
Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये सासरच्या मंडळीच्या छळाला कंटाळून पोलीस अंमलदाराच्या पत्नीने तिसऱ्या मजल्यावरून स्वतःला झोकून देत आत्महत्या केलीय

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात सासरच्या मंडळीच्या छळाला कंटाळून पोलीस अंमलदाराच्या पत्नीने तिसऱ्या मजल्यावरून स्वतःला झोकून देत आत्महत्या (Suicide) केलीय. ही खळबळजण घटना पोलीस आयुक्तालयातील वसाहतीमध्ये घडली. या घटनेनंतर महिलेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे पोलीस दलासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अडीच वर्षांपूर्वी विवाह, पतीसह सासरच्यांकडून छळ (Chhatrapati Sambhajinagar Crime)
मिळालेल्या माहितीनुसार, सबा समीर शेख (वय 21, राहणार आय ब्लॉक पोलीस आयुक्तालय इमारत) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सबा यांचा अडीच वर्षांपूर्वी अंमलदार समीर शेख याच्याशी विवाह झाला होता. समीर हा शहर पोलीस दलात कार्यरत असून सध्या जीन्सी पोलीस ठाण्यात विशेष शाखेत कार्यरत आहे. लग्नानंतर समीरने सबा यांना चांगली वागणूक दिली. मात्र काही दिवसानंतर छळ करायला सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून सबा माहेरी गेली होती. मात्र दोन्ही कुटुंबामध्ये मध्यस्थी झाल्यानंतर सासरी नांदायला पाठवले. त्यानंतर समीर हा तिच्यावर वेगवेगळी बंधन घालत होता. या त्रासाला सबा कंटाळली होती. दरम्यान गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सबाने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केलीय. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. मात्र, दसऱ्याच्या दिवशीच घडलेल्या या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
Nashik Crime News : नाशिकमध्ये 3-4 जणांकडून कृष्णा ठाकरे या तरुणावर शस्त्राने हल्ला
नाशिक शहरात सध्या 'हत्यांचं सत्र' सुरूच आहे. या घटनेमुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिकमध्ये घडलेल्या या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये सुरक्षिततेबद्दल भीतीचे वातावरण आहे. या 'हत्यांच्या सत्रा'मुळे स्थानिक प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे. नाशिकमध्ये घडणाऱ्या या घटनांमुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. या 'हत्यांच्या सत्रा'ला आळा घालण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. या घटनांमुळे नाशिक शहराची प्रतिमा मलिन होत आहे. 'हत्यांचं सत्र' थांबवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व स्तरांवरून प्रयत्न होणे अपेक्षित आहे.
























