एक्स्प्लोर

Crime News: धिप्पाड शरीर, फॉर्च्युनरमधून उतरला, वाद घालणाऱ्यांनी ग्राहकाला गुंड समजून वार केले अन् इंजिनिअरला संपवलं

Chhatrapati Sambhajinagar Crime News: हॉटेलमधील कामाला असलेल्यांसोबत वाद झाल्यानंतर त्याचवेळी जेवणासाठी आलेल्या अभियंत्याला हॉटेलचा मालक समजून एका टोळक्याने चाकूने वार करून अभियंत्याचा खून केल्याची घटना घडली.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका क्षुल्लक कारणास्तव एका अभियंत्याचा जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  हॉटेलमधील कामाला असलेल्यांसोबत वाद झाल्यानंतर त्याचवेळी जेवणासाठी आलेल्या अभियंत्याला हॉटेलचा मालक समजून एका टोळक्याने चाकूने वार करून अभियंत्याचा खून केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना जालना रोडवरील झाल्टा फाटा येथे यशवंत हॉटेलमध्ये काल (शुक्रवार दि. 6 डिसेंबर) रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष राजू पेड्डी (वय 28, रा. राज ज्योती नगर उस्मानपुरा) असं मयत अभियंताचं नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष राजू पेड्डी याने अभियंतेचं शिक्षण घेतलं होतं. तो एका सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कंपनीमध्ये नोकरी करतो. एका सॉफ्टवेअर कंपनीत तो घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करत असल्यामुळे संभाजीनगर येथील आपल्या घरी थांबला होता. दरम्यान, संतोष राजू पेड्डी याच्या नातेवाईकांचे लग्न असल्यामुळे कुटुंबातील इतर सदस्य हे हैदराबादला गेले होते. त्यामुळे संतोष हा घरी एकटाच होता. रात्री उशीरापर्यंत काम केल्यानंतर संतोष जेवण करण्यासाठी जालना रोडवर आला. तो झाल्टा फाटा येथील यशवंत हॉटेलमध्ये पोहोचला. त्याचवेळी हॉटेलमध्ये वेगळाच वाद सुरू होता.

हॉटेलमध्ये एका टोळक्याने जबरदस्ती जेवण मागिवलं होतं. त्यानंतर त्या टोळीने स्वतः फ्रीज उघडून थंड पेयाची बाटली घेतली. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांशी पैसे मागितल्यावर वाद सुरू झाला. त्याचवेळी संतोष हॉटेलमध्ये पोहोचला. तो फॉरच्यूनर कारमधून उतरून हॉटेलमध्ये चालत आला. संतोषची शरीरयष्टी बघून हॉटेल चालकाने आपल्याला मारण्यासाठी लोकं बोलवली आहेत, असा गैरसमज त्या टोळक्याचा झाला. त्याचवेळी क्षणाचाही विचार न करता टोळक्याने संतोष याच्यावर हल्ला केला. संतोषच्या छातीत चाकूने भोसकलं आणि तो रक्तबंबाळ झाला. त्याला रुग्णालयात दाखल केलं, मात्र, या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी चिखलठाणा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

किरकोळ भांडणावरून जावयाने सासूच्या घराला लावली आग

पत्नी माहेरी गेली या कारणावरून जावयाने चक्क सासुरवाडीतील घराला आग लावल्याचा धक्कादायक प्रकास समोर आला आहे. या घटनेत घरातील काही साहित्य जळाल्याने नुकसान झालं आहे. ही घटना कोथरूड परिसरातील सुतारदरा परिसरात गुरुवारी मध्यरात्री घडली आहे. या प्रकरणी सासूने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी जावई साहिल हनुमंत हाळंदे (वय 25, रा. भूगाव, ता. मुळशी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

महत्त्वाच्या बातम्या

मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Embed widget