बुलढाणा अर्बन सहकारी संस्थेत शेतकर्यांसह व्यापार्यांची फसवणूक; अध्यक्ष राधेश्याम चांडकसह इतर 5 जणांवर गुन्हे दाखल
वाशिमच्या मानोरा तालुक्यातील बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी अध्यक्ष राधेश्याम चांडकसह इतर 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
Washim Crime News : वाशिमच्या मानोरा तालुक्यातील बुलढाणा अर्बन शाखेत (Buldhana Urban Co-operative Credit Society Bank) शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची फसवणूक (Crime News) झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. बँकेच्या वेअर हाऊस विठोली शाखेत शेतकरी आणि व्यापारी आकाश देशमुख या शेतकऱ्यांनी 162 क्विंटल तूर आणि 96 क्विंटल सोयाबीन असा तब्बल 30 लाख रुपयांचा शेतमाल तारण करून ठेवलेला होता. मात्र, शेतकऱ्यांनी ठेवलेला शेतमाल कटकारस्थान रचून संस्थेचे अध्यक्ष आणि दोन्ही विभागातील विभागीय अध्यक्षांच्या सांगण्यावरून गोदाम व्यवस्थापक आणि शाखा व्यवस्थापक यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केलीय. तसेच शेत माल परस्पर विक्री करून त्या मालाचे पैसे परस्पर हडप केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या बद्दल बँकेच्या कर्मचाऱ्या विरुद्ध रुपये 30 लाख एवढ्या रकमेचा शेतमाल परस्पर विकून शेतकऱ्यांची आर्थिक हानी करून फसवणूक केली आहे. हे प्रकरण डिसेंबर 2022 मध्ये घडले होते. मात्र, आर्थिक देवाण घेवाणमुळे गुन्हा दाखल होत नसल्याने शेवटी तक्रार कर्त्यांनी न्यायालयाकडे धाव घेतली आणि न्यायालयाच्या आदेशाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर बुलढाणा अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष राधेश्याम चांडकसह इतर 5 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
अध्यक्ष राधेश्याम चांडकसह इतर 5 जणांवर गुन्हे दाखल
या प्रकरणी बुलढाणा अर्बन को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड (Buldhana Urban Co-operative Credit Society Bank) मुख्य शाखा बुलढाण्याचे अध्यक्ष राधेश्याम देवी किसन चांडक यांच्यासह इतर कार्यकारी संचालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात सुकेश ब्रिज मोहन झवर, अमोल प्रल्हाद शिंदे विभागीय व्यवस्थापक वाशीम, विठ्ठल तोताराम दळवी बुलढाणा अर्बन विभागीय व्यवस्थापक विभाग अकोला, श्रीकांत भालचंद्र डांगे शाखा व्यवस्थापक शाखा मानोरा, अनिल श्रीराम राठोड गोदाम व्यवस्थापक विठोली तालुका मानोरा आणि इतर संबंधित सर्व कर्मचारी यांनी संगतमत करून बुलढाणा वेअर हाउसमध्ये तारण ठेवलेला क्विंटल शेतमाल परस्पऱ्या विक्री केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाशिमच्या मानोरा पोलीस स्टेशनला भादवि कलम नुसार ३७९, ४०६, ४२०, ०४ आणि ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या