एक्स्प्लोर

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणी केमिस्ट्री प्राध्यापकाचा शोध सुरू, लातूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सीबीआयचा मुक्काम

CBI Investigation Latur : नीट पेपर लीक प्रकरणात सीबीआयने लातूरमध्ये तात्पुरते कार्यालय थाटले असून, आरोपी पी. व्ही. कुलकर्णी, शिवराज मोठेगावकर यांच्या चौकशीतून आर्थिक साखळीचा तपास वेगाने सुरू केला आहे.

NEET Paper Leak Case Latur Updates : नीट पेपर लीक प्रकरणाच्या तपासासाठी लातूरमध्ये दाखल झालेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (CBI) पथक सलग दुसऱ्या दिवशीही शहरात ठाण मांडून आहे. या हायप्रोफाईल प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता, सीबीआयने लातूर येथील शासकीय विश्रामगृहात (Government Rest House) आपले तात्पुरते कार्यालय उभारले आहे. या तात्पुरत्या मुख्यालयातूनच आता तपासाची सर्व सूत्रे वेगाने हलवली जात आहेत, ज्यामुळे लातूरच्या कोचिंग विश्वात प्रचंड खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी असलेले नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (NTA) पॅनेल सदस्य आणि सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी, 'आरसीसी' (RCC) क्लासेसचे संस्थापक प्रा. शिवराज मोठेगावकर आणि डॉ. मनोज शिरूरे यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने आता आपला मोर्चा आर्थिक व्यवहारांकडे वळवला आहे. फुटलेल्या पेपरच्या खरेदी-विक्रीमागे नेमकी कोणती मोठी आर्थिक साखळी सक्रिय होती, याचा कसून शोध घेतला जात आहे

NEET Scam Financial Nexus : 5 लाखांची डील आणि आर्थिक साखळीचा तपास  

सीबीआयच्या तपासात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. प्रा. शिवराज मोठेगावकर यांनी नीट परीक्षेचा केमिस्ट्रीचा पेपर मिळवण्यासाठी पी. व्ही. कुलकर्णी यांना तब्बल 5 लाख रुपये दिल्याचे सीबीआयने न्यायालयात स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर, आणखी किती विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून लाखो रुपयांची गोळाबेरीज करण्यात आली होती, तसेच ही आर्थिक देवाणघेवाण रोख स्वरूपात झाली की बँक खात्यांद्वारे, याचा मागोवा घेण्यासाठी सीबीआयने अनेक संशयितांची झाडाझडती सुरू केली आहे

Latur Chemistry Professor Radar : सीबीआयच्या रडारवर केमिस्ट्री प्राध्यापक 

सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या या तपासादरम्यान एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सीबीआयचे पथक आज लातूरमधील केमिस्ट्री (Chemistry) विषयाच्या एका नवीन प्राध्यापकाचा कसून शोध घेत आहे. या नवीन प्राध्यापकाचा पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये किंवा प्रश्नपत्रिका वितरणात काही सहभाग होता का? या दृष्टीने संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, हा प्राध्यापक नेमका कोण आहे आणि सीबीआय त्याचा शोध का घेत आहे, याबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली आहे. 

CBI Searches Latur RCC Classes : शहरात छापेमारी  

यापूर्वी, काल सीबीआयच्या आठ अधिकाऱ्यांच्या पथकाने लातूरमधील प्रसिद्ध 'आरसीसी' (RCC) कोचिंग क्लासेसच्या मुख्य कार्यालयावर धाड टाकत सुमारे तीन ते चार तास कसून चौकशी केली होती. तेथून महत्त्वाचे डिजिटल पुरावे आणि कागदपत्रे पडताळणीसाठी ताब्यात घेण्यात आली आहेत. आज सलग दुसऱ्या दिवशीही सीबीआयच्या पथकांनी लातूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अनेक संशयित व्यक्तींची आणि मध्यस्थांची चौकशी केली. पेपर लीक प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यासाठी सीबीआयचा हा तपास आता अत्यंत निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi CISF Jawan News: CISF जवान मेट्रोत चढला, लपून फोटो काढत बसला; महिलेने बघताच राडा; मोबाईलच्या गॅलरीमध्ये सगळं दिसलं, पुढे काय घडलं?
CISF जवान मेट्रोत चढला, लपून फोटो काढत बसला; महिलेने बघताच राडा; मोबाईलच्या गॅलरीमध्ये सगळं दिसलं, पुढे काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
Embed widget