एक्स्प्लोर

NEET Result : तुरुंगात असलेल्या मोटेगावरकरांच्या RCC क्लासचा NEET निकालानंतर जल्लोष, थोड्याच वेळात CBI च्या पथकाकडून चौकशी

CBI Raid In Latur RCC : नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचे पथक या महिन्यात तिसऱ्यांदा लातूरमध्ये दाखल झाले असून, आरसीसी कोचिंग क्लासेसमध्ये तीन तासांहून अधिक वेळ झाडाझडती घेण्यात आली.

NEET Paper Leak Case CBI Investigation : नीट पेपरफुटीनंतर चर्चेत आलेल्या लातूरमधील शिवराज मोटेगावकरांच्या आरसीसी या कोचिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा घेण्यात आलेल्या नीट परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलं. त्यानंतर या क्लासमध्ये जल्लोष सुरू झाला. मात्र या जल्लोषानंतर काहीच वेळात या सेंटरवर चौकशीसाठी सीबीआयचं पथक धडकल्याची घटना घडली. 

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाची साखळी जोडण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाचे (CBI) पथक पुन्हा एकदा लातूरमध्ये धडकले आहे. नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही वेळातच सीबीआयचे 8 अधिकाऱ्यांचे पथक पुण्यातून लातूरमध्ये दाखल झाले. या कारवाईमुळे लातूरमधील शैक्षणिक वर्तुळात आणि कोचिंग क्लास चालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयचे अधिकारी लातूरमधील नामांकित 'आरसीसी' (RCC) कोचिंग क्लासेसमध्ये दाखल झालं. या ठिकाणी तीन तासाहून अधिक काळ सीबीआयच्या पथकाकडून विविध कागदपत्रांची कसून पडताळणी करण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, नीट परीक्षेच्या निकालानंतर आरसीसी कोचिंग क्लासेसमध्ये उत्तम निकालाचा जल्लोष करण्यात आला होता. हा जल्लोष संपताच काही वेळात सीबीआयचे पथक तिथे पोहोचल्याने या कारवाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नीट पेपरफुटीनंतर झालेल्या री नीट परीक्षेत आरसीसीमधील 2,200 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी 36 विद्यार्थ्यांनी 600 पेक्षा अधिक गुण मिळवले असून, 530 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे साडेपाचशेच्या घरात आहे. त्यानंतर कोचिंग क्लासच्या वतीने जल्लोष करण्यात आला.

Shivraj Motegaonkar CBI Enquiry : शिवराज मोठेगावकर यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी

या धडक कारवाईत केवळ कागदपत्रांचीच तपासणी केली जात नाही, तर काही खासगी कोचिंग क्लास चालक आणि प्रसिद्ध प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी केली जाणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित संशयास्पद आर्थिक व्यवहारांची माहिती, बँक खात्यांचे तपशील आणि इतर कागदपत्रे सीबीआयच्या रडारवर असून, या अनुषंगाने सर्व पुरावे गोळा केले जात आहेत.

CBI Latur Visit 3rd Time : या महिन्यात तिसऱ्यांदा सीबीआय लातूरमध्ये

नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी नवनवीन माहिती समोर येत आहे. याच माहितीची खातरजमा करण्यासाठी आणि ठोस पुरावे संकलित करण्यासाठी सीबीआयचे पथक या एकाच महिन्यात तब्बल तिसऱ्यांदा लातूरमध्ये आले आहे. यावरून केंद्रीय यंत्रणा या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी वेगाने हालचाली करत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Suspense On CBI Action : तपासाबाबत सीबीआय कमालीची गोपनियता

आरसीसी कोचिंग क्लासेसमध्ये सीबीआयचे अधिकारी ठाण मांडून बसले असले आणि चौकशीचा धडाका सुरू असला, तरी तपासाच्या नेमक्या स्वरूपाबाबत सीबीआयच्या वतीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आलेली नाही. मात्र, सीबीआयच्या या वारंवार होणाऱ्या वाऱ्यांमुळे लातूरमधील मोठ्या कोचिंग लॉबीचे धाबे दणाणले आहेत.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
Pune Crime News: दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
Pune Crime News: नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
Shraddha Walker Death Case: श्रद्धा वालकरसाठी बोलायला लागले आणि पाकिस्तानातून निनावी फोन येऊ लागले; आत्या राजल नाईकांचा गंभीर आरोप
श्रद्धा वालकरसाठी बोलायला लागले आणि पाकिस्तानातून निनावी फोन येऊ लागले; आत्या राजल नाईकांचा गंभीर आरोप
Advertisement

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget