एक्स्प्लोर

Bihar Cyber Crime : निपुत्रिक महिलांना गर्भवती करा आणि 5 ते 10 लाख कमवा; बिहारमध्ये ठगांच्या टोळीचा कहर, अनेक तरुणांना गंडवलं

Bihar Cyber Crime : नाव नोंदणी करायची आहे असं सांगून तरुणांकडून मोठी रक्कम घेतली जायची. त्या माध्यमातून तीन तरुणांनी अनेकांना गंडा घातल्याचं समोर आलं आहे. 

Bihar Cyber Crime : सोशल मीडियाचा वापर करून फसवणूक करण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कोण कशा पद्धतीने फसवणूक करेल याची खात्री देऊ शकत नाही. पण बिहारमध्ये काही तरुणांना ज्या प्रकारे फसवण्यात आलं ते वाचून अनेकांना धक्काच बसेल. निपुत्रिक महिलांना गरोदर करा आणि त्या बदल्यात पाच ते दहा लाख रुपये कमवा अशी स्कीम या ठगांनी आणली. या जाळ्यात जे तरूण अडकले त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यात आल्याची घटना बिहारमध्ये उघडकीस आली आहे.  

बिहारच्या नवाडा येथे पोलिसांनी अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सहा मोबाईल फोन व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहेत.

नोंदणीच्या नावाखाली पैसे उकळायचे

निपुत्रिक महिलांना गरोदर बनवण्याच्या बदल्यात 5 ते 10 लाख रुपये मिळतील अशा प्रकारची स्कीम या आरोपींनी आणली होती. त्यामध्ये एखादी व्यक्ती त्यांच्या जाळ्यात आली तर त्याच्याकडून नोंदणीच्या नावावर पैसे उकळण्यात यायचे. 

महत्त्वाचं म्हणजे अटक करण्यात आलेले आरोपी हे फक्त 20 वर्षांचे आहेत. आरोपी हे 'ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब आणि प्ले व्हॉईस सर्व्हिस'च्या नावावर फसवणूक करायचे. निपुत्रिक महिलेला गर्भवती करण्यासाठी जाहिरात द्यायचे. त्यामध्ये एकादा तरुण यांच्या जाळ्यात सापडलाच तर त्याच्याकडून नाव नोंदणीच्या नावाखाली 500 ते 20 हजार रुपये घ्यायचे. 

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून सहा मोबाईल जप्त करण्यात आले. फोटो गॅलरी, व्हॉट्सॲप चॅट आणि ऑडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून त्यांनी ही फसवणूक केल्याचं उघडकीस आली आहे.

फसवणूक कशी करायचे?

फेसबुक आणि व्हॉट्सॲप सारख्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे यूजर्सना एक मेसेज दिला जायचा. हाय प्रोफाइल मुली किंवा तरुणीला गर्भवती करायचे आहे असा मेसेज असायचा. ही मुलगी घटस्फोटित किंवा मोठ्या घरची गृहिणी असल्याचा दावाही जाहिरातीत करण्यात यायचा. ती मुलगी गर्भवती होऊ शकत नाहीत  म्हणून त्या एजन्सीशी संपर्क साधतात असं त्यामध्ये सांगण्यात यायचं. यानंतर एजन्सी ग्राहकाशी संपर्क साधत असल्याचा बनाव ते करायचे.

5 ते 10 लाखांचे आमिष

संबंधित महिला गरोदर राहिल्यानंतर 5 ते 10 लाख रुपये मिळतील असे जाहिरातींद्वारे सांगितले जायचे. जर मुलगी गरोदर राहिली नाही तर त्यांना पैसे परत दिले जातात असंही त्या जाहिरातीमध्ये सांगितलं जायचं. जाहिराती पाहून लोक जेव्हा या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात यायचे तेव्हा त्यांना नोंदणी शुल्क भरून लाभ घेता येतो असे सांगितले जाते. या प्रकरणात कोणतीही फसवणूक होऊ नये म्हणून नाव नोंदणी शुल्क आकारले जाते असं ते सांगायचे. त्यामुळे या जाहिरातीला अनेकजण भुलले आणि त्यांनी पैसेही भरल्याचं समोर आलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Torres Company Scam : पैशांची आस गुंतवणूकदारांना चुना; Torres Scam ची इनसाडईड स्टोरी Special ReportSalman khan Home Bulletproof Glass : बॉलिवूडच्या टायगरला 'बुलेटप्रूफ' कवच Special ReportMNS च्या Mahayuti तल्या एन्ट्रीला शिंदेंकडून ब्रेक? भाजप मनसेला दत्तक घेणार? Special ReportDhananjay Munde : धंनजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा, वाढता विरोध तरी दादा पाठिशी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
Embed widget