एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

कोचिंग सेंटरमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थीनीवर अत्याचार, व्हिडीओ बनवून दीड वर्षांपासून लैंगिक शोषण, आईला समजताच...

Crime News : कोचिंग सेंटरमधील शिक्षकाने विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने तरुणीला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलही केलं.

बिहार : कोचिंग सेंटरमधील (Coaching Center) शिक्षकाने (Teacher) विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार (Molestation Case) करत गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. गुरुने आपल्याच शिष्याशी असं घृणास्पद कृत्य केलं आहे. इतकंच नाही तर आरोपी शिक्षकाने घृणास्पद कृत्याचा व्हिडीओ काढून तरुणीला (Girl Student) ब्लॅकमेल करत मागील दीड वर्षांपासून तिच्यावर अत्याचार केले. शिक्षकाने कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थिनीसोबत लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याची ही घटना बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातून उघडकीस आली आहे. ही घटना परिहार पोलीस ठाणे क्षेत्रातील आवारात घडली आहे. 

नेमकं काय घडलं?

आरोपी शिक्षकाने आधी विद्यार्थिनीला लग्नाचं आमिष दाखवलं आणि नंतर त्या विद्यार्थिनीसोबत शारीरिक संबंध ठेवले. यावेळी त्याने व्हिडीओ चित्रित केला. त्यानंतर आरोपी शिक्षकाने तरुणीला व्हिडीओ दाखवत तिचं लैंगिक शोषण केलं. आरोपी शिक्षक तरुणीला मागील दीड वर्षांपासून व्हिडीओ दाखवत ब्लॅकमेल करत होता. शिक्षकाने वारंवार लैंगिक संबंधांसाठी तिला धमकावलं. यादरम्यान, तरुणीने लग्न करण्याची मागणी केल्यावर त्याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. दरम्यान, तरुणीच्या आईने दोघांना आक्षेपार्ह स्थिती पकडल्यानंतर हे प्रकरण समोर आलं.

प्रकरण उघडकीस कसं आलं?

एक दिवस तरुणी कोचिंगला गेली, मात्र खूप उशीर झाला तरी परत घरी आली नव्हती. यानंतर पीडितेची आई थेट कोचिंग सेंटरमध्ये पोहोचली. जिथे तिने दोघांनी आक्षेपार्ह स्थिती पकडलं. समोरील दृश्य पाहताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. पीडितेच्या आईने आधी काही दिवस बदनामीच्या भीतीने घटनेची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, नंतर पीडितेच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल केला.

परिहार येथील बडा गावातील रहिवासी शिक्षक राजेश कुमार या घटनेतील मुख्य आरोपी आहे. आरोपी शिक्षक राजेशने गावात कोचिंग उघडलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी जानेवारी 2022 पासून या कोचिंगमध्ये शिकण्यासाठी जात होती. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

आरोपीच्या कुटुंबीयांकडून प्रकरण दाबण्यासाठी दोन लाख रुपयांची ऑफर

30 एप्रिल 2024 रोजी विद्यार्थिनीला परतायला उशीर झाला तेव्हा तिची आई कोचिंग सेंटरमध्ये पोहोचली. यावेळी तिला दोघेही आक्षेपार्ह अवस्थेत दिसले. शिक्षकाला झापलल्यानंतर महिला आपल्या मुलीला घेऊन घरी पोहोचली. चौकशीदरम्यान विद्यार्थिनीने 10 सप्टेंबर 2022 ते 30 एप्रिल 2024 पर्यंत आरोपीने तिच्यावर 70 वेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं सांगितलं. विद्यार्थ्याच्या आईने एफआयआरमध्ये पोलिसांना सांगितलं आहे की, शिक्षक राजेश कुमार तिच्या मुलीला लग्नाचं आमिष दाखवून अनैतिक कृत्य करत होता. तक्रार करण्यासाठी ती शिक्षिकेच्या घरी पोहोचली तेव्हा राजेश, त्याची आई तेत्री देवी आणि वडील रामश्रेष्ठ ठाकूर यांच्यासह आरोपीने प्रकरण दडपण्यासाठी तिघांनीही दोन लाख रुपयांची ऑफरही दिली. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली असता त्यांना मारहाणही करण्यात आली.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

पार्श्वभागात दांडा टाकत पोलिसांची बेदम मारहाण, आरोपीचा कोठडीतच मृत्यू; ठाणेदारासह पाच कर्मचाऱ्यांची बदली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rishabh Pant IPL 2025 : रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
Parth Pawar: अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yogesh Kadam Full Interview : मुख्यमंत्रि‍पदासाठी शिंदे युती तोडणार नाहीत, ते उद्धव ठाकरे नाहीत..ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 AM 26 November 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स-Rohit Pawar PC | निवडणूक आयोगाने आम्ही सांगू ती मशीन कॅमेऱ्याच्या निगराणीखाली उघडावीतRohit Pawar PC | निवडणूक आयोगाने आम्ही सांगू ती मशीन कॅमेऱ्याच्या निगराणीखाली उघडावीत- रोहित पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rishabh Pant IPL 2025 : रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
Parth Pawar: अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
Mumbai Indians : लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
Eknath Shinde  : एकनाथ शिंदेंनी अर्थशास्त्र बघून नव्हे तर ह्रदयशास्त्र पाहून काम केलं, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, सुधीर मुनगंटीवार म्हणाले...
एकनाथ शिंदे म्हणाले नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा निर्णय मान्य, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, मुनगंटीवार म्हणाले...
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Eknath Shinde PC : भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा,  मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा, मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
Embed widget