(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बाप बनला हैवान! पोटच्या 10 वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या करून मृतदेहावर केला बलात्कार, भिवंडीतील घटना
Bhiwandi Crime : रागाच्या भरात बापाने मुलीची हत्या केली आणि नंतर स्वतःच्या मृत मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भिवंडी येथे घडली आहे.
भिवंडी : बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना भिवंडी शहरात घडली आहे. एका 36 वर्षीय नराधम बापाने पोटच्या 10 वर्षीय अल्पवयीन मुलीला रागाच्या भरात मारहाण केली. त्यानंतर टॉवेलच्या साहाय्याने गळा आवळून हत्या केली एवढेच नव्हे तर या नराधम बापाने मुलीच्या मृतदेहासोबत बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो तसेच हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत मुलगी नराधम बाप आणि आईसोबत भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होती. ती सहावीत होती. मृत पीडित मुलीवर अनेक दिवसापासून नराधम बाप लैंगिक अत्याचार करत होता. त्यामुळे मृत मुलगी त्याला विरोध करत असल्याने दोघांमध्ये सतत भाडणं होत होती. त्यातच नराधम बाप दारूच्या नशेत घरी आला. त्यावेळी घरात कोणी नसल्याचे पाहून मुलीवर बळजबरी करत असल्याने दोघांमध्ये भांडण झाले. रागाच्या भरात बापाने मुलीची हत्या केली आणि नंतर स्वतःच्या मृत मुलीवर बलात्कार केला. या नराधम बापाने तिचा घरातील टॉवेलच्या साहाय्याने गळा आवळून तिची हत्या केली आणि घटनास्थळावरून फरार झाला .
दुसरीकडे घटनेची माहिती भिवंडी शहर पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. त्यानंतर नराधम बापावर पोक्सोसह अत्याचार तसेच हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. नराधम बापाला भिवंडी शहरातून तीन तासातच अटक करून बेड्या ठोकल्या आहे. आज नराधम बापाला न्यायालयात हजर केले असता सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास भिवंडी शहर पोलीस करीत आहेत. तर या घटनेची माहिती मिळताच भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी कुटुंबियांची भेट घेतली व या गुन्ह्या संदर्भात फास्ट कोर्टात खटला चालवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मयत मुलीच्या आईने नराधम बापाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.
संबंधित बातम्या :