एक्स्प्लोर

Blackmailing : आयफोनसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या, बेवारस मृतदेहाच्या हत्येची उकल

दुकानात नोकरीवर असताना दुकानदारासोबत शारीरिक संबंध झाले. याचा फायदा घेत तरुणी वारंवार पैशांसाठी ब्लॅकमेल करायची. महागडा फोन घेण्यासाठीही तिने त्रास देणे सुरु केले. त्यामुळे दुकानदाराने तिचा खून केला.

नागपूरः तरुणी ज्या ज्वेलर्सच्या दुकानात काम करायची तिथेच तरुणाच्या (love) प्रेमात पडली. त्यातून त्या दोघांचे शारीरिक संबंध झाले. काही काळानंतर तिने प्रियकराकडे (lover) पैशाची मागणी केली. तर आता महागडा आयफोन (Iphone) घेऊन देण्यावरुन त्याला ब्लॅकमेलिंग करणे सुरु केले होते. तिच्या वारंवार धमकावण्याच्या प्रकाराला कंटाळून दुकानदाराने काम करत असलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकासोबत तिला कायमचे संपविले. गेल्या आठवड्यात ही घटना घडली होती. काटोल  (Katol road) हद्दीतील चारगांव मार्गावरील विटभट्टी समोरील रोडलगत अनोळखी युवतीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी ओळख पटविल्यानंतर खुनाचे बिंग फुटले.

अशी पटली ओळख

मृत युवतीच्या अंगात पिवळ्या रंगाचा टी शर्ट, कमरेत काळ्या रंगाचा पांढरे लांब पट्टे असलेला प्लाजो परिधान केला होता. नाकात पिवळ्या धातूची नथ घातलेली आढळळी. उजव्या हातावर तीन 'स्टार' गोंदलेले दिसून आले. या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिस अधिक्षकांनी काटोल पोलिसांचे व स्थानिक गुन्हे शाखेची विशेष पथके तयार करुन वेगवेगळ्या मार्गाने तपास सुरु केला. मृत युवती ही मध्यप्रदेश येथील असण्याची शक्यता असण्याची शक्यता वाटत असल्याने पथकाने मध्यप्रदेशातील पांढुर्णा, बडचिचोली, मुलताई या भागात जावून मिसिंग व्यक्तींचा शोध घेतला. अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले. मुलगीची ओळख पटल्याची माहिती काटोल पोलिस ठाण्याला मिळाली. ग्राम आमळा (जि. बैतूल, मध्यप्रदेश)  (MP) येथील लता अशोक काचेवार यांना चारगांव शिवारातील अनोळखी मृत मुलीचे फोटो दाखविले. फोटो पाहून मृत मुस्कान ही लता कोचेवार यांची मुलगी असल्याचे निष्पन्न झाले.

नेहमीच मागायची पैसे

मुस्कान ही आमला येथील क्रिष्णा ज्वेलर्स येथे काम करायची. कामानिमित्त ती बरेचवेळा बाहेरगावी जायची. यावरुन पथकाने क्रिष्णा ज्वेलर्स येथे चौकशी केली असता दुनाकाचा मालक पुनित सुनिल सोनी (वय 28, गणेश कॉलनी, आमला) व त्याच्या दुकानात काम करणारा नोकर विधीसंघर्षग्रस्त बालकाने मुस्कानची हत्या केल्याचे उघड झाले. मुस्कान काचेवार ही 1 वर्षापूर्वी क्रिष्णा ज्वेलर्स या दुकानात कामाला होती. दुकानाचा मालक पुनित व मुस्कान यांच्यात प्रेमसंबंध जुळले. यादरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. मुस्कान याच गोष्टीचा फायदा घेऊन पुनितला पैशासाठी ब्लॅकमेल करायची व नेहमी पैसे मागत असायची. मागिल काही दिवसांपासून तिने पुनितला मोबाईल विकत घेऊन देण्याचा तकादा लावला. याकरीता वारंवार पुनितला त्रास देत होती.

ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून हत्या

मुस्कानकडून होणाऱ्या ब्लॅकमेलींगच्या (Blackmailing) जाचाला कंटाळून पुनित याने त्याच्या दुकानातील विधीसंघर्षग्रस्त बालकासोबत मिळून मुस्कान हिला संपविण्याचे ठरविले. तिला मोबाईल देण्याच्या बहाण्याने बोलावले. ती आल्यावर पुनित नोकरासह मुस्कान हिला स्वतःच्या वाहनात बसवून आमला येथून नागपूरकडे (Nagpur) निघाला. रस्त्यामध्ये काटोलपासून सुमारे 95 किमी अंतरावर नागपूरच्या दिशेने जात असताना वाहन चारंगाव शिवारातील विटभट्टी रोडच्या बाजूला थांबविले. मुस्कान हिला पुनित व त्याच्या नोकराने जिवे ठार करुन तिचा मृतदेह रोडच्या बाजूला फेकून पळ काढला.

Supreme Court On Bail : जामिनासाठी नवा कायदा असावा, लोकशाहीमध्ये पोलीस राजला स्थान नाही; सुप्रीम कोर्टाने सुनावले

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
Bhandara Accident News: भाजप खासदाराच्या गाडीनं भंडाऱ्यात दोघांना चिरडलं; भंडाऱ्यातील तुमसर - रामटेक मार्गावरील घटना, गुन्हा दाखल करत अपघातग्रस्त वाहन जप्त
भाजप खासदाराच्या गाडीनं भंडाऱ्यात दोघांना चिरडलं; भंडाऱ्यातील तुमसर - रामटेक मार्गावरील घटना, गुन्हा दाखल करत अपघातग्रस्त वाहन जप्त
Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबरचा दुसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबरचा दुसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
Delhi Jantar Mantar Protest: निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलनाची तयारी; कार्यकर्त्यांना पोलिसांचे फोन अन् धमक्या? कार्यकर्त्यांची धरपकड
निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलनाची तयारी; कार्यकर्त्यांना पोलिसांचे फोन अन् धमक्या? कार्यकर्त्यांची धरपकड

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dipali Sayyed And Vivekanand Patil MPSC Protest: दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
Nana Patekar Last Rite Performed At Midnight: नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
Jalgaon Crime: पैशांचा वाद विकोपाला गेला, 21 वर्षीय भूषणचा काटा काढला; नंतर फुटपाथवर बॉडी फेकली अन्...; जळगाव हादरले!
पैशांचा वाद विकोपाला गेला, 21 वर्षीय भूषणचा काटा काढला; नंतर फुटपाथवर बॉडी फेकली अन्...; जळगाव हादरले!
Nana Patekar Demise Tanushree Dutta Reaction Viral: 'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
Nagpur BJP: बंडोबांना थंड करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांचाही जोरदार प्रयत्न; नितीन गडकरींचा अनिल सोलेंना फोन, पण...; नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचं टेन्शन वाढलं
बंडोबांना थंड करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांचाही जोरदार प्रयत्न; नितीन गडकरींचा अनिल सोलेंना फोन, पण...; नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचं टेन्शन वाढलं
Nana Patekar: ‘आग लागण्याची वाट पाहायची का?’ जळगावमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाना पाटेकर का संतापले होते? नेमकं काय घडलं होतं?
‘आग लागण्याची वाट पाहायची का?’ जळगावमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाना पाटेकर का संतापले होते? नेमकं काय घडलं होतं?
Maharashtra Legislative Council Election : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी चढाओढ; कुठे थेट लढत, कुठे बंडखोरी, किती आले उमेदवारी अर्ज अन् किती ठरले वैध, जाणून घ्या सविस्तर
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी चढाओढ; कुठे थेट लढत, कुठे बंडखोरी, किती आले उमेदवारी अर्ज अन् किती ठरले वैध, जाणून घ्या सविस्तर
Embed widget