Bhandara News: भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न , विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत दोघांवर गुन्हा
Bhandara News: भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करून विनयभंग केल्याप्रकरणी पॉक्सो अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
Bhandara News Update : शाळा सुटल्यानंतर अॅटोची वाट बघत थांबलेल्या अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करून तिचा विनयभंग करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात ही घटना घडली आहे. अनिकेत शहारे (वय 20) आणि सूरज जिवतोडे (वय 22) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
पीडित मुलगी ही 15 वर्षाची असून ती भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यामधील आहे. शाळेत जाण्यासाठी गावातून ती एकटीच येते. परंतु, गेल्या आठ -दहा महिन्यांपासून अनिकेत शहारे तिचा पाठलाग करून विक्षिप्त इशारे करत होता. याबाबत मुलीने तिच्या वडिलांकडे त्याची तक्रार केली होती. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी अनेक वेळा त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु, या युवकाने त्यांचे ऐकले नव्हते.
काल शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे पीडित मुलगी गावात जाण्यासाठी अॅटोची पाहात थांबली होती. यावेळी सुरज जीवतोडे हा दुचाकीवरून तिच्याजवळ आला आणि धमकी देत तिला बळजबरीने दुचाकीवर बसवून तिथून पळ काढला. दरम्यान, पीडित मुलीच्या वडिलांना त्यांच्या मुलीला कोणीतरी दुचाकीवरून पळवून नेत असल्याची बाब सांगितली. त्यामुळे त्यांनी दुचाकीचा पाठलाग करून युवकाला ताब्यात घेतले. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी अनिकेत शहारे आणि सुरज जीवतोडे या दोघांविरुद्ध अल्पवयीन मुलीला पळवून नेणे आणि विनयभंग करणे याबाबत पॉक्सो अंतर्गत कारवाई करत दोघांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक मनोज वाढई यांनी दिली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्वाच्या बातम्या
- आसाराम बापूच्या आश्रमातील कारमध्ये मुलीचा मृतदेह आढळला; चार दिवसांपूर्वी झाली होती बेपत्ता
- Pune Crime : महिलेकडून झोपलेल्या पतीचा गळा आवळून खून, गळफास घेतल्याचा बनाव रचला
- आमदाराच्या विरोधात बातम्या दाखविल्या, पोलिसांनी पत्रकारांना पोलीस ठाण्यातच केले नग्न, देशभरात चर्चा सुरू
- Gadchiroli: अल्पवयीन मुलीची हत्या करुन मृतदेह जमिनीत पुरला, गडचिरोलीत धक्कादायक घटना