आसाराम बापूच्या आश्रमातील कारमध्ये मुलीचा मृतदेह आढळला; चार दिवसांपूर्वी झाली होती बेपत्ता
Crime News : उत्तर प्रदेशातील आसाराम बापूच्या आश्रमात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
![आसाराम बापूच्या आश्रमातील कारमध्ये मुलीचा मृतदेह आढळला; चार दिवसांपूर्वी झाली होती बेपत्ता crime news uttar pradesh minor girl deadbody found in asaram bapu ashram at uttar pradesh आसाराम बापूच्या आश्रमातील कारमध्ये मुलीचा मृतदेह आढळला; चार दिवसांपूर्वी झाली होती बेपत्ता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/03/e6dbe0032272cab3eadbe35f494a97fc_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Crime News : अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी तुरुंगातही कमी होताना दिसत नाही. उत्तर प्रदेशातील बहराइच मार्गावरील आसाराम बापूच्या आश्रमात एका कारमध्ये गुरुवारी रात्री एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही मृत तरुणी चार दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. पोलिसांनी सध्या आश्रमाला सील लावले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री गोंडा पोलिसांना याची माहिती मिळाली. बहराइच मार्गावरील आसाराम बापूच्या आश्रमात 12 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला. ही माहिती समजताच आश्रम आणि परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये मृतावस्थेत आढळलेली मुलगी ही आश्रमाजवळ वास्तव्यास होती. ती चार दिवसांपासून घरातून बेपत्ता होती. ज्या कारमध्ये तिचा मृतदेह आढळला, ती ऑल्टो कार मागील काही दिवसांपासून आश्रमात उभी होती.
गुरुवारी रात्रीच्या वेळी कारमधून दुर्गंधी येऊ लागल्याने आश्रमातील कर्मचाऱ्यांनी कार उघडली. त्यावेळी त्यांना मृतदेह आढळला. कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने आश्रम आणि कारची तपासणी करत आहेत.
पतीचे अपहरण करणाऱ्यांनी मुलीला ठार केले; मुलीच्या आईचा आरोप
मृत मुलीच्या आईने सांगितले की, मंगळवारी रात्रीपासून माझी मुलगी बेपत्ता झाली आहे. आम्ही जवळपासच्या परिसरात तिचा शोध ही घेतला. मात्र, ती सापडली नाही. पोलिसांनाही याची माहिती दिली. त्यानंतर अचानकपणे तिचा मृतदेह कारमध्ये आढळला. काही वर्षापूर्वी मुलीच्या वडिलांचे अपहरण झाले होते. ज्यांनी त्यांचे अपहरण केले, त्यांनीच माझ्या मुलीची हत्या केली असा आरोप मुलीच्या आईने केला आहे. मुलीच्या आईने काही संशयितांची नावे सांगितली असून पोलीस तपास सुरू आहे.
पोलिसांनी आश्रम सील केले असून अतिशय गंभीरपणे तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक शिवराज प्रजापती यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)