एक्स्प्लोर

Beed Crime News: बीडच्या कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षकाकडून मुलीचं लैंगिक शोषण, आरोपी आमदार संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्तीय

Beed Crime Girl Molestation In Class: बीडमधील कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणी घेणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाप्रकरणी सर्वच पक्ष संघटना आणि पालक आक्रमक आहेत.

Beed Crime Girl Molestation In Class: खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणी दोन शिक्षकांवर पोस्को अंतर्गत बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकांवरच गुन्हा दाखल झाल्यानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे या दोन शिक्षकांचे नाव असून बीड (Beed News) शहरात हे दोघे जण खाजगी कोचिंग क्लासेस चालवतात. सदर प्रकरणानंतर पालक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

सदर घटनेच्या निषेधार्थ बीडमधील कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात आले असून कोचिंग क्लासेस परिसरात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुलीच्या फिर्यादीवरून दोन्ही शिक्षकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून दोन्ही शिक्षक अद्याप फरार आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षकांच्या अटकेसाठी विशेष पथक रवाना केले आहे.

आरोपी शिक्षक विजय पवार आमदार संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्तीय-

विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे या दोन शिक्षकांचे नाव असून विजय पवार याला राजकीय पाठबळ असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तर आरोपी शिक्षक विजय पवार हा विद्यमान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा कार्यकर्ता असून त्याचे अनेक फोटो सोशल माध्यमावर व्हायरल होत आहे.

राज्य महिला आयोगानेही या घटनेची घेतली दखल-

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची प्रसारमाध्यमांवर झळकलेली बातमी पाहून राज्य महिला आयोगाने तत्काळ दखल घेतली. उमा किरण क्लासेसमधील दोन प्राध्यापकांवर गंभीर आरोप असून, हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचं असल्याचं आयोगाने नमूद केलं आहे. आरोपी निश्चित होईपर्यंत क्लासेसची इमारत सील ठेवावी, सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावं व फरार आरोपींचा शोध घ्यावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. इतर विद्यार्थिनींच्या तक्रारींचीही नोंद घ्यावी, अशी सूचना आहे. आयोगाने या प्रकरणी चौकशी करून कार्यवाहीचा अहवाल तात्काळ ईमेलद्वारे सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

नेमकी काय घटना काय?

पीडित मुलीकडून पोलिसांकडे देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी संत भगवान बाबा उच्च माध्यमिक महाविद्यालय खरवंडी कासार येथे 11 वीचे अॅडमीशन घेतले असुन एप्रील 2024 मध्ये उमा किरण कोचिंग क्लासेस येथे नीटचे क्लासेस लावले होते. सकाळी 09.00 ते 12.00 पर्यंत उज्वल अभ्यासिका येथे अभ्यासीका लावली होती व तेथे मी नेहमी अभ्यास करण्याकरीता जात असायचे. जुलै 2024 पासून प्रशांत खाटोकर सर 12.00 वा.सु मी अभ्यासीकेमधून बाहेर येण्याच्या टाईमला माझ्या अभ्यासीकेच्या खाली येवून थांबायचे व मला म्हणायचे तू माझ्यासोबत चल गाडीवर बस, तेव्हा मी त्याला नाही म्हणायचे. क्लासेसचा टाईम दुपारी 2 ते दुपारी 6 पर्यंत असायचा. मी तेथे क्लास रेग्युलर करत होते. प्रशांत खाटोकर सर जे फिजिक्स शिकवतात ते मला क्लास संपल्यानतर तेथील केबिनमध्ये एकटीला बोलवून ते माझी कीस घ्यायचे, माझ्या छातीला व गुप्त अंगाला बॅड टच करायचे. अंगावरील कपडे काढायला लावून माझे ते फोटो काढायचे. कधी कधी ते क्लास संपल्यानंतर क्लासरुम मध्ये कोणी नसताना तिथे सुध्दा ते मला किस करायचे व छातीला व इतर अंगाला बॅड टच करायचे. ते असे माझ्यासोबत वारंवार करत असायचे. मला धमकी द्यायचे की, तू जर घरी कोणाला सांगितले तर मी तुला मारुन टाकेन, अशी धमकी प्रशांत खाटोकर यांनी आपल्याला दिल्याचे पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या  तक्रारीत म्हटले आहे.

राज्यासह देशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

Beed crime news: 'केबिनमध्ये बोलावून किस करायचे, माझ्या छाती अन् गुप्तांगाला बॅड टच करायचे'; बीडच्या क्लासमध्ये 17 वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat Case: अशोक खरातच्या अडचणी वाढल्या! आर्थिक फसवणूक प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
अशोक खरातच्या अडचणी वाढल्या! आर्थिक फसवणूक प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
' ती क्लिप एआयने बनवलेली' वाल्मिक कराडचा कथित कॉल गेलेल्या सुग्रीव कराडची पहिली प्रतिक्रिया; बजरंग सोनवणेंच्या आरोपावर काय म्हणाला?
' ती क्लिप एआयने बनवलेली' वाल्मिक कराडचा कथित कॉल गेलेल्या सुग्रीव कराडची पहिली प्रतिक्रिया; बजरंग सोनवणेंच्या आरोपावर काय म्हणाला?
Pune University FDA Crime : जेवणात जिवंत झुरळ, किचन अस्वच्छ अन्....; ‘एफडीए’ची पुणे विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये एफडीएची धडक कारवाई, मेस केली बंद
जेवणात जिवंत झुरळ, किचन अस्वच्छ अन्....; ‘एफडीए’ची पुणे विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये एफडीएची धडक कारवाई, मेस केली बंद
Jalgaon Crime: रसवंतीची गाडी जप्त केल्याने संतापला, लोखंडी रॉड घेऊन महापालिकेत धडकला; महापौरांच्या गाडीकडे गेला अन्...; जळगावात खळबळ
रसवंतीची गाडी जप्त केल्याने संतापला, लोखंडी रॉड घेऊन महापालिकेत धडकला; महापौरांच्या गाडीकडे गेला अन्...; जळगावात खळबळ

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया
Gold Silver Rate : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर
Pune MPSC Protest: एमपीएससी आंदोलनात उपोषण सोडताच पुणे पोलिसांकडून ऋषिकेश गांगुर्डे, सोमनाथ चव्हाण, गजानन शेळकेसह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल; रोहित पवार अन् विवेकानंद पाटीलचं काय झालं?
एमपीएससी आंदोलनात उपोषण सोडताच पुणे पोलिसांकडून ऋषिकेश गांगुर्डे, सोमनाथ चव्हाण, गजानन शेळकेसह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल; रोहित पवार अन् विवेकानंद पाटीलचं काय झालं?
Abhijeet Dipke: 'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
आदित्य ठाकरे म्हणाले, देशात आणीबाणी; म्हणाले, लोकांना ताब्यात घेतलं, नोटीस बजावल्या, रेल्वे रद्द, मेट्रो बंद
आदित्य ठाकरे म्हणाले, देशात आणीबाणी; म्हणाले, लोकांना ताब्यात घेतलं, नोटीस बजावल्या, रेल्वे रद्द, मेट्रो बंद
Tanushree Dutta : 'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
Embed widget